जिया गिरीश शेट्टी(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : 24 ऑगस्ट 2025—21 ते 23 ऑगस्ट दरम्यान देहरादून येथे पार पडलेल्या आशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 स्पर्धेत गती, सहनशक्ती आणि रणनीतीचे थरारक प्रदर्शन पाहायला मिळाले. यामध्ये भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिल आहे. जपान, थायलंड, चायनीज तायपेई, व्हिएतनाम, सिंगापूर आणि फिलिपिन्ससह नऊ देशांतील खेळाडूंनी या ऑलिंपिक हिवाळी खेळात उत्साहाने सहभाग घेतला होता. भारताच्या वाढत्या आइस-स्केटिंग समुदायासाठी ही स्पर्धा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण
भारताकडून सर्वाधिक प्रकाशझोतात राहिली महाराष्ट्राची 11 वर्षीय जिया गिरीश शेट्टी. ग्रुप डी (अंडर-12) मध्ये खेळताना जियाने बर्फावर दाखवलेली सातत्यपूर्ण व निर्भय कामगिरी प्रेक्षकांच्या दादेला पात्र ठरली. तिने 333 मीटर आणि 500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, 777 मीटरमध्ये रौप्यपदक पटकावले आणि मिश्र रिले मध्ये आणखी एक रौप्य मिळवत एकूण चार पदके आपल्या नावे केली. या कामगिरीमुळे ती भारतासाठी सर्वोच्च पदकविजेती ठरली असून आशियातील सर्वाधिक आश्वासक युवा खेळाडूंपैकी एक म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले.
हेही वाचा : ‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा
या सर्व कामगिरींमुळे भारतातील आइस-स्केटिंगसारख्या हिवाळी क्रीडेत उगवत्या खेळाडूंची ताकद अधोरेखित झाली असून, या खेळाला देशात हळूहळू नवसंजीवनी मिळत असल्याचे दिसत आहे.
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 6 ऐवजी 8 संघ सहभाग घेणार आहेत. या 8 पैकी आतापर्यंत 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आज 25 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी ओमान क्रिकेट संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ओमान आशिया कप 2025 च्या स्पर्धेत आपला पहिला सामना 12 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमान क्रिकेटकडून आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जतिंदर सिंह याच्याकडे ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.