विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Manoj Tiwari’s comments on Virat Kohli’s retirement : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाण्यापूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहलीने अशी अचानक घेतलेली निवृत्ती सर्वांना धक्का देणारी होती. असे म्हटले जात होते की, त्याने निवृत्तीबद्दल आधीच विचार केला असावा. पण विराटकडून निवृत्तीबाबत कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आले नव्हते. त्यांच्या चाहत्यांच्या लक्षातच आले नाही की, त्यांच्या सुपर स्टारकडून इतका मोठा निर्णय का घेतला असावा? क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी त्याच्या निवृत्ती घेण्याबाबत तर्क लावले होते. आता पुन्हा एकदा माजी खेळाडू मनोज तिवारीने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठे विधान केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज मनोज तिवारीने विराट कोहलीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. तिवारी म्हणाला की, “मला माहित नाही नेमके काय घडले? पडद्यामागील नेमकी कहाणी काय आहे? मला वाटते की त्याला भारतीय संघात त्याची गरज आहे असे वाटले नसावे. या मागील कारण फक्त तोच हे सांगू शकतो. मला वाटते की याबाबत तो कधीही सार्वजनिक व्यासपीठांवर येऊन हे बोलू शकणार नाही. आता तो एक माणूस बनला आहे आणि तो एक माणूस म्हणून विकसित झाला आहे.”
मनोज तिवारी पुढे म्हणाला की, “तो कमीत कमी तीन-चार सामने सहज खेळला असता. हे माझ्यासह सर्व क्रिकेट चाहत्यांसोबत झाले असते. त्याची निवृत्ती खूपच धक्कादायक राहिली आहे. कारण आम्हाला इतकीच माहिती होती की तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे आणि इंग्लंड मालिकेसाठी स्वतःला तयार करत आहे.”
विराट कोहली इंग्लंड मालिकेपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. त्याने यापूर्वी टी-२० क्रिकेटला देखील अलविदा म्हटले आहे. परंतु तो काही वर्षांसाठी एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. त्याने टीम इंडियासाठी एकूण १२३ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने एकूण ९२३० धावा केल्या आहेत. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३१ अर्धशतके, ३० शतके आणि ७ द्विशतके झळकावली आहेत.