फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Team Italy Coach John Davison : T२० विश्वचषक २०२६ चे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये संयुक्तपणे केले जाणार आहे. या विश्वचषकामध्ये एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी अनेक संघाना अनेक स्पर्धा खेळाव्या लागणार आहेत आणि त्यांना टी-२० विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी टॉप २० मध्ये स्थान मिळवावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी इटलीच्या संघाची तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी, इटली क्रिकेट संघाने त्यांचे मुख्य प्रशिक्षक नियुक्त केले आहेत.
माजी क्रिकेटपटू जॉन डेव्हिडसन यांची इटलीच्या टी-२० संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेव्हिडसनने आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडासाठी क्रिकेट खेळले आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाकडून राज्य पातळीवर क्रिकेट खेळला आहे. जॉन डेव्हिडसन यांनाही चांगला कोचिंग अनुभव आहे. आता हे पाहणे बाकी आहे की त्याच्या प्रशिक्षणाखालील इटालियन संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतो की नाही? २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळविण्यासाठी, इटली संघ युरोपियन रीजन फायनल्स स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धेत नेदरलँड्स, स्कॉटलंड, ग्वेर्नसे आणि जर्सी येथील संघ सहभागी होतील. या संघांपैकी फक्त २ संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरतील.
John Davison, the former Canada captain and Australian state cricketer, has been named Italy’s T20I coach as they push for a place at the 2026 T20 World Cup https://t.co/Z46jk1M5UN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 7, 2025
इटली टी-२० संघाचे नवे प्रशिक्षक झाल्यानंतर जॉन डेव्हिडसन म्हणाले की, इटली टी-२० संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्याने मी खूप उत्साहित आणि सन्मानित आहे. इटालियन खेळाडूंबद्दल मी जे काही ऐकले आहे, त्यानंतर असे दिसते की त्यांना जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
जॉन डेव्हिडसनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कॅनडासाठी ३२ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ७९९ धावा केल्या, ज्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ३६ विकेट्स घेतल्या. याशिवाय, ५ टी-२० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना डेव्हिडसनने ४४ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या.