पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश
कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते?
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काय खावे?
रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम पचनशक्तीवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच संतुलित आणि पौष्टीक अन्नपदार्थांचे सेवन करावे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. सतत जंक फूडचे सेवन, तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. नेहमीच बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडून खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही. ज्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो, त्यामुळे शरीर नेहमीच डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे खाल्ले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरासाठी प्रभावी आहेत.(फोटो सौजन्य – istock)
दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही, ताक, लस्सी इत्यादी थंड पेयांचे सेवन केल्यास पचनक्रिया निरोगी राहील. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होईल. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरिया वाढून पचनक्रियेब सुधारते. आतड्यांचे आरोग्य मजबूत आणि सुलभ ठेवण्यासाठी नियमित दही किंवा ताक प्यावे.
शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यापासून ते अगदी शरीर कायमच हायड्रेट राहण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. कायमच हेल्दी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी शरीरातील घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि ऍसिडिटी होत नाही.
मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही
पचनक्रियेला चालना देण्यासाठी आहारात नेहमीच फायबर असलेले पदार्थांचे भरपूर सेवन करावे. नियमित बदाम, पेरू, कोशिंबीर, काकडी, पपई, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. पोटात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी फळांचे सेवन करावे. फळे आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असते.
Ans: फळे, भाज्या, शेंगा, संपूर्ण धान्य आणि काजू यांसारख्या संपूर्ण अन्नांचा आहारात समावेश करा.
Ans: पोटदुखी, गॅस आणि सूज बद्धकोष्ठता किंवा अतिसार
Ans: अति प्रमाणात साखर आणि चरबीयुक्त पदार्थ






