Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs GT : राणासोबत पंगा महागात! बटलरचा झेल चुकताच, हर्षितच्या रुद्रावताराचे झाले दर्शन..

काल झालेल्या ३९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला. या सामन्यात जोस बटलरचा सोपा झेल सोडल्यामुळे केकेआरचा गोलंदाज हर्षित राणा चिडला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 22, 2025 | 10:01 AM
KKR vs GT: Rana's fight is expensive! Butler's catch is missed, Harshit sees Rudravatar..

KKR vs GT: Rana's fight is expensive! Butler's catch is missed, Harshit sees Rudravatar..

Follow Us
Close
Follow Us:

KKR vs GT : आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगामाचा थरार अर्ध्यावर आला आहे. आतापर्यंत ३९ सामने खेळवण्यात आले आहेत.  काल झालेल्या ३९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स समोरासमोरा आले होते. या सामन्यात गुजरात संघाने कोलकाता संघाचा पराभव केला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या. प्रतिउत्तरात कोलकात्याला १५९ धावाच करता आल्या, परिणामी केकेआरला ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज जोस बटलरने १७८ च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याचा एक झेल सोडणे केकेआरला चांगलाचा महागात पडला, तसेच झेल चुकवला म्हणून गोलंदाज हर्षित राणा संतपेलला दिसून आला.

शेवटी, जोस बटलरच्या या निर्णायक खेळीमुळे, गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९९ धावांचे लक्ष्य उभे करू शकला.  दुसरीकडे, कोलकाताच्या गोलंदाजांनी सामन्यात खूपच निराशाजनक कामगिरी केली. त्याचा फटका संघाला बसला. त्यातच गुजरातच्या डावात एके ठिकाणी केकेआरचा गोलंदाज हर्षित राणा रागावलेला दिसून आला.

हेही वाचा : IPL २०२५ : ‘आता आम्ही पुढील वर्षासाठी संघ तयार करणार’ : चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे मत

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की,  केकेआरचा गोलंदाज वैभव अरोराकडून हर्षित राणाच्या गोलंदाजीवर जोस बटलरचा एक सोपा झेल सुटला. यानंतर हर्षित राणा केकेआरचा दुसरा गोलंदाज वैभव अरोरावर चिडेलेला दिसून आला. कारण, हर्षित राणाकडून बटलरसाठी खूप विचारपूर्वक योजना आखण्यात आली होती. त्याला बाहेरचा रास्ता दाखवणींशी ही एक उत्तम संधी होती. मात्र, वैभवने कॅच सोडल्यामुळे जोस बटलरला जीवनदान मिळाले आणि त्याने वेगवान खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.

गुजरात टायटन्सच्या १५ व्या षटकात हा प्रकार घडून आला. या षटकात गुजरातला वेगाने धावा काढायच्या होत्या. त्यानंतर केकेआरकडून  हर्षित राणा गोलंदाजी करायला आला. यादरम्यान, त्याने बटलरला एक लांबीचा चेंडू टाकला. जोस बटलरने तो हवेत मारायचा प्रयत्न केला.  मिड-विकेटवर उभ्या असलेल्या वैभव अरोराला चेंडू पकडण्याची पूर्ण संधी होती, परंतु, तो झेल घेण्यास अपयशी ठरला. यावर हर्षित राणा चिडला.

हेही वाचा : MI vs CSK : ‘तुमच्या क्षमतेवर शंका घेणे सोपे..’; CSK विरुद्धच्या खेळीबाबत MI च्या ‘हिटमॅन’ रोहितने व्यक्त केल्या भावना

गुजरात टायटन्सचा केकेआरवर ३९ धावांनी विजय..

आयपीएल २०२५ चा ३९ वा सामना काल  कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने कोलकाता नाईट राइडर्सला पराभूत केले. कोलकाताच्या गोलंदाजांनी या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे गुजरातच्या संघाने १९८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. कोलकाताच्या संघाने आपल्या पहिल्या दोन विकेट लवकर गामावल्या होत्या. त्यामुळे संघाला धाव करण्यात अडचणी आल्या आणि रन रेट देखील वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणजे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना  39 धावांनी जिंकला.  गुजरात टायटन्सच्या संघाने कोलकात्याला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केळे.

केकेआर आणि जीटीचा प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज

Web Title: Kkr vs gt harshit rana got angry after buttler dropped the catch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • Harshit Rana
  • IPL 2025
  • KKR vs GT
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
1

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
3

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
4

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.