स्टीफन फ्लेमिंग(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : यावर्षीच्या आयपीएलमध्ये आपल्या स्थानाबद्दल सीएसके वास्तववादी आहे. परंतु पाच वेळा विजेता संघ पुढील वर्षी चांगले खेळाडू शोधण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचे मत चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केले. रविवारी मुंबई इंडियन्सकडून नऊ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईला आठ सामन्यांतील सहावा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.
हेही वाचा : IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त..
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला पाच विकेटच्या मोबदल्यात फक्त १७६ धावा करता आल्या. रोहित शर्मा (नाबाद ७६) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ६८) यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईने हे लक्ष्य आरामात गाठले. तुम्ही तुमच्या पातळीपेक्षा कमी खेळत असताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रेरणा मिळणे
कठीण असते. पण आम्हाला आमचे मनोबल वाढवावे लागेल. चेन्नईचा थिंक टँक त्यांचे नशीब बदलण्यासाठी अशा भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्याचा प्रयत्न करेल. २०२२ मध्ये नववे स् था न मिळवल्यानंतर २०२३ मध्ये जेतेपद जिंकताना त्याच्या संघाने केलेले बदल फ्लेमिंगच्या मनात असतील. या स्पर्धेत काहीही वाया जाणार नाही.
हेही वाचा : DC vs LSG : पंतच्या फॉर्मसोबतच कर्णधारपदाचा लागणार कस, आज डीसीचे असणार आव्हान, लखनौपुढे दिल्लीचे पारडे जड..
ज्या स्पर्धांचे निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत त्या स्पर्धा आम्ही पाहू, परंतु त्या स्पर्धांच्या शेवटी आम्ही केलेले काम पुन्हा राबवून, ते आम्हाला पुढील वर्षी विजयासाठी तयार करेल. ही फार मोठी संधी नाही कारण आम्हाला शेवटपर्यंत स्पर्धेत राहायचे आहेण. पण जर आम्हाला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता नसली, तरी आगामी लढतीत आम्ही चांगली कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयपीएल २०२५ चा ३९ वा सामना काल कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने कोलकाता नाईट राइडर्सला पराभूत करत गुणतालिकेत आपले पहिले स्थान अधिक पक्के केले. तर केकेआरला या सीझनच्या पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे गुजरातच्या संघाने १९८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. कोलकाताच्या संघाने आपल्या पहिल्या दोन विकेट लवकर गामावल्या होत्या. त्यामुळे संघाला धाव करण्यात अडचणी आल्या आणि रन रेट देखील वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणजे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला. गुजरात टायटन्सच्या संघाने कोलकाताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं.