Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs RCB  :  कोलकाता नाईट रायडर्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 175 धावांचे आव्हान; रहाणे, नरेन चमकले.. 

आजपासून आयपीएल 2025 ची सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. केकेआरने आरसीबीला 175 धावांचे आव्हान दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 22, 2025 | 09:48 PM
KKR Vs RCB: Kolkata Knight Riders set Royal Challengers Bangalore a target of 175 runs; Rahane, Narine shined..

KKR Vs RCB: Kolkata Knight Riders set Royal Challengers Bangalore a target of 175 runs; Rahane, Narine shined..

Follow Us
Close
Follow Us:

KKR Vs RCB  : आजपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामास सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर 174  धावांपर्यंत मजल मारली आहे. आरसीबीसमोर आता 175 धावांचे आव्हान असणार आहे.

केकेआरचा डाव..

नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर्णधार रजत पाटीदारचा हा निर्णय चुकीचा ठरवत केकेआरने पहिल्या 10 ओव्हरमध्येच 100 धावा केल्या. यावेळी केकेआरची सुरवात थोडी खराब झाली. क्विंटन डी कॉक झटपट बाद होऊन माघारी परतला. त्याला हेझलवूडने बाद केले. त्याने 5 चेंडूत 4 धावा केल्या. मात्र त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपला शानदार खेळ दाखवत सुनील नरेनच्या साथीने तूफान फलंदाजी केली. पहिल्या 3 षटकांत फक्त 9  धावा काढणाऱ्या कोलकाताने पुढच्या 3 षटकांत 51 धावा काढून ईडन गार्डन्सवर धमाल केली.

मात्र, सुनील नरेनने 26 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याला रसिक दार सलामने बाद केले. त्यांतर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएल 2025 चे पहिले अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने २५ चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामाची तुफानी सुरुवात केली. त्याला  कृणाल पंड्याने माघारी पाठवले. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले.

नरेन नंतर केकेआरचा उपकर्णधार व्यंकटेश अय्यर फार काही खास करू शकला नाही. तो कृणाल पांड्यांचा शिकार ठरला. त्याला 7 चेंडूत 6 धावाच करता आल्या. त्यांनंतर रिंकू सिंग आपली जादू दाखवू शकला नाही. 10 चेंडूत 12 धावा करत तो कृणाल पांड्यांचा बळी ठरला. मग अंगकृष रघुवंशीने डाव सांभाळत 22 चेंडूत तडकाफडकी 30 धावा केल्या. त्याला यश दयालने बाद केले. सर्वांना अपेक्षा असलेला आंद्रे रसेलही आपली कमाल दाखवू शकला नाही. तो सुयश शर्माच्या बॉलवर बाद झाला. हर्षित राणा( 6 चेंडू 5 धावा) लवकर बाद झाला. रमणदीप सिंग (6 धावा) आणि  स्पेन्सर जॉन्सन (1 धाव) नाबाद राहिले.

आरसीबीकडून कृणाल पांड्यांने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याला 29 धावा मोजाव्या लागल्या.  जोश हेझलवूडने 22 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. तर यश दयाल, रसिक दार सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग 11

आरसीबीचा प्लेइंग 11

विराट कोहली, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल

केकेआरचा प्लेइंग 11 

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

 

Web Title: Kkr vs rcb kkr sets 175 run target for rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB vs KKR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
4

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.