गुणतालिकेचं समीकरण : इंडियन प्रीमियर लीग 2024 चे टॉप – 4 संघ मिळाले आहेत. आज आयपीएल 2024 मध्ये सुपर संडेला दोन सामने रंगणार आहेत. यंदाच्या सीझनमधील दोन साखळी सामने शिल्लक राहिले आहेत. यामधील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटी येथे रंगणार आहे. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 सुरु होणार आहे.
[read_also content=”सात्विक चिरागने थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत चीनच्या जोडीला केलं पराभूत https://www.navarashtra.com/sports/satwik-chirag-defeated-the-chinese-pair-in-the-final-round-of-thailand-open-2024-535258.html”]
आजच्या सामान्यांमुळे गुणतालिकेमध्ये बदल होऊ शकतात. आजच्या दोन सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे. गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर कोलकाता नाईट राइडर्सचा संघ आहे. त्यामुळे त्यांची जागा कोणताही संघ घेऊ शकत नाही. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यांमध्ये विजयी झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चौथ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एलिमिनेटर सामना खेळणार हे पक्के आहे पण त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळणार हे आज निश्चित होणार आहे.
जाणून घ्या सर्व समीकरणे
समीकरण 1
आज सुपर संडेच्या पहिल्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभव झाला, तर हैदराबाद तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाईल आणि राजस्थान दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर जाईल जा या समीकरणानुसार एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
[read_also content=”वेड्या चाहत्यांनी आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश केला जल्लोषात साजरा https://www.navarashtra.com/sports/crazy-fans-celebrate-rcbs-entry-into-the-playoffs-royal-challengers-bangalore-535170.html”]
समीकरण 2
राजस्थान रॉयल्सने शेवटचा आजचा साखळी सामना जिंकला आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात पराभूत केले, तर दोघांच्या स्थानांमध्ये कोणताही फरक राहणार नाही. त्यानंतर राजस्थान दुसऱ्या आणि हैदराबाद तिसऱ्या स्थानावर राहील. या समीकरणामुळे एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
समीकरण 3
राजस्थान रॉयल्स आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादनेही विजय मिळवला, म्हणजेच दोन्ही संघांनी आपला शेवटचा साखळी सामना जिंकला तरीही त्यांच्या स्थानांमध्ये कोणताही फरक होणार नाही. अशा स्थितीत राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर तर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर राहील. हे समीकरण असतानाही एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूचा सामना हैदराबादशी होणार आहे.