
38th National Sports 2025: महाराष्ट्राच्या लेकीनं गाजवली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; पूजाने केली पदकांची हॅट्रिक
रुद्रपूर: कोल्हापूरच्या पूजा दानोळनेे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंग क्रीडा प्रकारात पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली.पूजाने तीन किलोमीटर अंतराच्या वैयक्तिक कौशल्य प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या आधी तिने एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकावले होते. श्वेता गुंजाळ हिने कास्यपदक पटकावित महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगमधील 3 किलोमीटर प्रकारात पूजा दानोळेने चार मिनिटे 04.494 सेकंदात अंतर पार करीत सलग तिसर्या पदकाचा नाव कोरले. ओडिसाच्या स्वस्ति सिंग हिने हे अंतर चार मिनिटे 03.255 सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. पूजा हिने याआधी वैयक्तिक टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.
महिलांच्या पाचशे मीटर्स वैयक्तिक कौशल्य क्रीडा प्रकारात श्वेता गुंजाळ हिला कांस्यपदक मिळाले त्यावेळी तिने हे अंतर 38.085 सेकंदात पार केले. अंदमान व निकोबारची खेळाडू सेलेस्टीना (37.018 सेकंद) व तामिळनाडूची जे श्रीमती (38.070) सेकंद यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले.
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.ष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे.
महिला गटात सलग दुसर्यांदा सोनेरी यश
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.