एचएस प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत(फोटो-सोशल मिडिया)
Malaysia Masters : एचएस प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यासह भारताच्या पुरुष खेळाडूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार सुरुवात केली. परंतु दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू पहिल्या फेरीतच पराभूत झाली. प्रणॉयने पाचव्या मानांकित जपानच्या केंटा निशिमोतोचा १९.२१, २१.१७, २१.१६ असा पराभव केला. आता त्याचा सामना जपानच्या युशी तनाकाशी होईल. तर सतीश करुणाकरनने तिसऱ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनचा २१.१३, २१.१४ ने पराभव केला.
हेही वाचा : क्रीडा जगतात खळबळ! श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला अटक, गंभीर आरोपामुळे केली कारवाई…
आता तो फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हविरुद्ध खेळेल. भारताच्या आयुष शेट्टीने कॅनडाच्या ब्रायन यांगला २०.२२, २१.१०, २१.८ ने पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला. नंतर, माजी जागतिक नंबर वन श्रीकांतने चीनच्या सहाव्या क्रमांकाच्या लू गुआंगचा २१-२१, १३-२१, २१-११ असा पराभव केला. तथापि, सिंधूचा खराब फॉर्म कायम राहिला आणि सुपर ५०० स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिला व्हिएतनामच्या गुयेन थुय लिन्हकडून ११-२१, २१-१४, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी इंडोनेशियाच्या अदनान मौलाना आणि इंदाह काह्या सारी जमील यांचा २१-१८, १५-२१,२१-१४ असा पराभव केला आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. असित सूर्या आणि अमृता प्रमुथेश यांना अव्वल मानांकित जियांग झेंग बँग आणि वेई यशिन यांच्याकडून २१-१०, २१-१२ असा पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गड्ढे यांना चौथ्या मानांकित चीनच्या गुओ झिन वा आणि चेन फांग हुई यांच्याकडून २१.१०, २१. १४ने पराभव पत्करावा लागला. करुणाकरन आणि आद्य वरियाथ यांना इंडोनेशियाच्या वेरेल युस्टिन मुलिया आणि लिसा कुसुमावती यांच्याकडून २१.१५, २१. १६ ने पराभव पत्करावा लागला.
दिल्लीला पराभूत करत मुंबईचा दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश..
आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना काल वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी दणदणीत पराभव केला. यासह, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सूर्यकूमर यादवच्या ४३ चेंडूत काढलेल्या ७३ धावांच्या जोरावर दिल्लीसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, डीसी धावांचा पाठलाग करताना १८.२ षटकांत केवळ १२१ धावांपर्यंतच पोहचू शकला. परिणामी एमआयने हा सामना ५९ धावांच्या फरकाने आपल्या खिशात टाकला.