मुंबई इंडियन्स टीम(फोटो-सोशल मिडिया)
DC Vs MI : आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना काल वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी दणदणीत पराभव केला. यासह, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सूर्यकूमर यादवच्या ४३ चेंडूत काढलेल्या ७३ धावांच्या जोरावर दिल्लीसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, डीसी धावांचा पाठलाग करताना १८.२ षटकांत केवळ १२१ धावांपर्यंतच पोहचू शकला. परिणामी एमआयने हा सामना ५९ धावांच्या फरकाने आपल्या खिशात टाकला.
मुंबईच्या या विजयाचा खरा होरो ठरला तो म्हणजे सूर्यकुमार यादव. त्याने कठीण परिस्थितीत संघासाठी ४३ चेंडूचा सामना करत ७३ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या दरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले. विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे अभिवादन केले.
हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये दिल्लीला हरवून प्लेऑफमध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश मिळवला. सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून मुंबई इंडियन्सला पूर्ण पाठिंबा देण्यात आला. मुंबईच्या प्रत्येक सीमेवर प्रेक्षकांकडून खूप गोंधळ घालण्यात आला. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांचे आभार मानले.
हेही वाचा : MI Vs DC: दिल्ली कॅपिटल्सचे घामटे निघाले, मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा कहर; Playoff मध्ये दिमाखात एंट्री
सामना संपल्यानंतर, मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी मैदानावर आले. यावेळी, एमआयच्या खेळाडूंनी हातात एक भला मोठा बॅनर धरला होता. खेळाडूंनी हा बॅनर हातात घेऊन मैदानात एक फेरी मारली. या बॅनरवर ‘थँक यू मुंबई’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. मुंबईकडून आलेल्या या शुभेच्छाचे प्रेक्षकांनीही मोठ्या आनंदाने स्वीकार केला.
सूर्यकुमार यादवने मुंबईचा डळमळीत झालेला डाव सावरला. तसेच त्याला यावेळी नमन धीरची मोठी साथ मिळाली. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १८० धावांपर्यंत नेऊन पोहचवली. सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४३ चेंडूचा सामना करत ७३ धावांची नाबाद जलद खेळी केली. याशिवाय, नमन धीरने अखेर ३०० च्या स्ट्राईक रेट राखत २४ धावा केल्या.
11th time Mumbai Indians qualified for Playoffs 🔥🔥🔥
Thank you MUMBAI 🙌🙌🙌#MIvsDC #DCvsMI #MIvDC #DCvMI pic.twitter.com/1WseEmgbFb
— The Sports Feed (@thesports_feed) May 21, 2025
काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. संघाकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँट्रान यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या. यामुळेच दिल्लीचा संघ १२१ धावांवर सर्वबाद झाला. तसेच ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी देखील प्रत्येकी १ विकेट घेऊन संघला विजयापर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली.
हेही वाचा : ‘धोनीच्या जागी मी असतो तर संन्यास…’ भारताच्या पूर्व कोचने साधला निशाणा, म्हणाला आता थांबण्याची वेळ
मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. यानंतर दिल्लीला पंजाब किंग्जविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्ली आणि पंजाब दोघांसाठीही हा सामना केवळ एक औपचारिकता असणार आहे. असेल.