Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manav Suthar Milestone: पदार्पण असावं तर असं! पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट तर २५ वर्षांपूर्वीचा दुर्मिळ रेकॉर्ड काढला मोडीत

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५ गडी गमावून अवघ्या ११३ धावा केल्या आहेत. भारताकडून मानव सुथारने (Manav Suthar) तीन विकेट घेतल्या. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 05:48 PM
Manav Suthar Milestone (Photo Credit- X)

Manav Suthar Milestone (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पदार्पण असावं तर असं!
  • पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट
  • तर २५ वर्षांपूर्वीचा दुर्मिळ रेकॉर्डही काढला मोडीत
Manav Suthar Debut: मुल्लानपूर येथे भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५ गडी गमावून अवघ्या ११३ धावा केल्या आहेत. भारताकडून मानव सुथारने (Manav Suthar) तीन विकेट घेतल्या. भारताने आपला पहिला डाव तब्बल ५६४ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारावर अफगाणिस्तानचा संघ अजूनही ४५१ धावांनी पिछाडीवर असून प्रचंड अडचणीत सापडला आहे. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात भारताचा नवा स्टार फिरकीपटू मानव सुथार  याने अफगाणिस्तानच्या अफसार झाझाईला त्याच्या खेळण्याचा फायदा उठवत बाद केले आणि दिवसाचा खेळ संपताना पाहुण्या संघाला पाचवा मोठा धक्का दिला.

असा मिळाली मानव सुथारला पहिली विकेट

पहिल्या डावात डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या डावातील ६ व्या षटकात मानव सुथार गोलंदाजीला आला. या षटकातील पहिले तीन चेंडू त्याने अचूक टप्प्यावर टाकत निर्धाव राखले. लागोपाठ तीन चेंडू हुकल्याने दबावात आलेल्या अफगाणिस्तानच्या अब्दुल मलिकने चौथ्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला.

That maiden Test wicket feeling! 🥳 Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rIJSt5OsHt — BCCI (@BCCI) June 7, 2026

मानवने ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर मलिकने ‘स्वीप शॉट’ मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून हवेत उडाला. फर्स्ट स्लिपमधून के. एल. राहुल आणि शॉर्ट फाईन लेगवरून मोहम्मद सिराज चेंडूच्या दिशेने धावले. अखेर सिराजने हा झेल अप्रतिमरित्या टिपला आणि २८ धावांवर अफगाणिस्तानची पहिली विकेट पडली. ही मानव सुथारच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट ठरली.

२५ वर्षांनंतर ऐतिहासिक विक्र एलिट क्लबमध्ये ८ वा भारतीय

 पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत मानव सुथारने दिमाखात प्रवेश केला आहे. अशी दुर्मिळ कामगिरी करणारा तो भारताचा ८ वा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००१ मध्ये टिनू योहानन यांनी असा पराक्रम केला होता. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी हा मान मिळवणारा मानव हा पहिलाच भारतीय ठरला आहे.

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

पहिल्याच षटकात विकेट घेणारे भारतीय गोलंदाज:

१. मोंटू बॅनर्जी – विरुद्ध वेस्ट इंडिज, १९४८

२. मनोहर हर्डीकर – विरुद्ध वेस्ट इंडीज, १९५८

३. वामन कुमार – विरुद्ध पाकिस्तान, १९६१

४. चेतन शर्मा – विरुद्ध पाकिस्तान, १९८४

५. डब्ल्यू. व्ही. रमण – विरुद्ध वेस्ट इंडिज, १९८८

६. निलेश कुलकर्णी – विरुद्ध श्रीलंका, १९९७

७. टिनू योहानन – विरुद्ध इंग्लंड, २००१

८. मानव सुथार – विरुद्ध अफगाणिस्तान, २०२६

राजस्थान ते टीम इंडिया प्रवास

मानव सुथारचा जन्म ३ ऑगस्ट २००२ रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. सुथार हा एक डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू असून तो डावखुरा फलंदाजही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने १७ फेब्रुवारी २०२१-२२ रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रविरुद्ध प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच, त्याने २०२२ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले.

गुजरातने २०२४ मध्ये मानव सुथारला संघात सामील केले. गुजरातने २०२५ च्या आयपीएल हंगामासाठी त्याला ३० लाख रुपयांना परत विकत घेऊन त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी त्याला आयपीएल २०२६ साठी त्याच्या मूळ किमतीत कायम ठेवले. मानव सुथार २०२४ ते २०२६ या तीन हंगामांमध्ये मिळून एकूण पाच आयपीएल सामने खेळला. त्या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. विशेष म्हणजे आयपीएलनंतर आता भारतीय संघातही त्याला गिलच्याच नेतृत्वाखाली पदार्पणाची संधी मिळाली आहे. जीटी संघ यावर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

रणजी ट्रॉफीत दमदार प्रदर्शन

मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जबरदस्त छाप पाडली आहे. मानवने २९ प्रथम-श्रेणी सामन्यांच्या ६२ डावांमध्ये १२९ विकेट्स घेतले आहेत. त्याने एका सामन्यात तीन वेळा १० विकेट्स, सहा वेळा ५ विकेट्स आणि आठ वेळा ४ विकेट्स घेतले आहेत. तसेच, त्याने राजस्थानकडून रणजी ट्रॉफीच्या एका डावात ८ विकेट्स घेतले असून, ही त्याची प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.

मानव सुथारने एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये (ACC Emerging Teams Asia Cup) यूएई ‘अ’ संघाविरुद्ध लिस्ट ‘अ’ संघात पदार्पण केले. त्याने २५ लिस्ट ‘अ’ सामन्यांमध्ये ३४ विकेट्स घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/३२ आहे. तसेच, त्याने २९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतले आहेत.

IND Vs AFG Live: अफगाणिस्तानला रिव्ह्यू न घेण्याची शिक्षा; KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक

Web Title: Manav suthar milestone rare test debut record after 25 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs AFG
  • Team India
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत
1

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित
2

IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी
3

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी

IND Vs AFG: पहिला दिवस, भारताचाच बोलबाला! Shubhman Gill अन् KL Rahul समोर अफगाण हतबल
4

IND Vs AFG: पहिला दिवस, भारताचाच बोलबाला! Shubhman Gill अन् KL Rahul समोर अफगाण हतबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.