ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये कांगारुच्या संघाने मालिका नावावर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेगवान गोलंदाजांनी या फॉरमॅटमध्ये ४०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी एका खेळाडूने ७०० पेक्षा जास्त, एका खेळाडूने ६०० पेक्षा जास्त, २ खेळाडूंनी ५०० पेक्षा जास्त आणि ७ खेळाडूंनी ४०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यादीत मिशेल स्टार्कचे नाव जोडले गेले आहे.
फोटो सौजन्य – X
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा वेगवान गोलंदाज आहेत ज्यांनी प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. मॅकग्राच्या नावावर ५६३ विकेट्स आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
वेस्ट इंडिजचा वॉल्श हा दिग्गज गोलंदाज आहे, कोर्टनी वॉल्श याच्या नावावर ५१९ बळी आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा जगातील सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ७०४ बळी घेतले. या फॉरमॅटमध्ये ७०० पेक्षा जास्त बळी घेणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६०४ विकेट्स घेतल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
मिशेल स्टार्क व्यतिरिक्त, या फॉरमॅटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे ६ गोलंदाज आहेत. त्यात डेल स्टेन (४३९), कपिल देव (४३४), रिचर्ड हॅडली (४३१), शॉन पोलॉक (४२१), वसीम अक्रम (४१४) आणि कर्टली अॅम्ब्रोस (४०५) यांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया