Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Eliminator : हार्दिकच्या मुंबईचा गिलच्या टायटन्ससमोर लागणार कस! आज GT आणि MI समोरासमोर भिडणार.. 

आज ३० मे रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघासाठी आज करो वा मरो अशी परिस्थिति आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 10:32 AM
IPL Eliminator: How will Hardik's Mumbai fare against Gill's Titans! GT and MI will face off today..

IPL Eliminator: How will Hardik's Mumbai fare against Gill's Titans! GT and MI will face off today..

Follow Us
Close
Follow Us:

IPL Eliminator : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. एलिमिनेटरमध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाणार आहे. तर विजेत्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. खराब सुरुवात झाली असून देखील मुंबई इंडियन्स संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.  टायटन्सने गेल्या चार हंगामात तिसऱ्यांदा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि या काळात २०२२ मध्ये पदार्पणातच जेतेपदही जिंकले. तथापि, गिल आणि हार्दिक दोघांनाही सिद्ध करायचे आहे.

हेही वाचा : RCB Vs PBKS : Virat Kohli च्या ‘त्या’ कृतीने Anushka Sharma चा चेहरा लज्जेने लाल, प्रतिक्रिया व्हायरल; पहा व्हिडिओ

टायटन्स अधिक चिंतेत पडणार आहे.  कारण, प्ले ऑफपूर्वी त्यांची गती कमी झाली आहे. संघाने गेल्या दोन पराभवांमध्ये विरोधी संघाला ४६५ धावा दिल्या आहेत. आता त्यांना चेंडूने चांगली कामगिरी करावी लागेल. संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य खेळाडू  मोहम्मद सिराजला पॉवर प्लेमध्ये संघाला यश मिळवून द्यावे लागणारया आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खानला नवीन चेंडूने संघर्ष करावा लागला आहे, ज्यामुळे टायटन्सच्या समस्या वाढल्या आहेत आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या गोलंदाजांवर दबाव वाढला आहे.  वेगवान गोलंदाजी, विभागाती  कमकुवतपणाव्यतिरिक्त, फिरकी गोलंदाज रशीद खानच्या अकार्यक्षमतेमुळे गोलंदाजीमध्ये संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

बुमराह, बोल्टच्या कामगिरीवर यश

टायटन्सप्रमाणे, परदेशी खेळाडूंच्या जाण्यामुळे मुंबईलाही त्रास सहन करावा लागला आहे. रायन रिकेल्टनने टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मासोबत चांगली कामगिरी केली आहे, परंतु हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आता राष्ट्रीय संघात सामील झाला आहे. इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्सबाबतही असेच आहे. इंग्लंड संघाबाहेर असलेल्या फलंदाज जॉनी बेअरस्टो व्यतिरिक्त, मुंबईने रिचर्ड ग्लीसन आणि चरित अस्लंका यांना संघात समाविष्ट केले आहे. एलिमिनेटरमध्ये रोहितसोबत बेअरस्टो डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीत तिलक वर्माची खराब कामगिरी देखील मुंबईसाठी चिंतेचे कारण आहे. सूर्यकुमारने फलंदाजीत मुंबईसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याने चालू हंगामात ६४० धावा केल्या आहेत. जर तो अपयशी ठरला तर मुंबईचा मार्ग खूप कठीण होईल. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सारख्या गोलंदाजांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे गोलंदाज विरोधी संघाला अधिक त्रास देत आहेत.

हेही वाचा : IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात..

बटलरची उणीव भासणार

फलंदाजी विभागात, साई सुदर्शन, गिल आणि जोस बटलर या तीन अव्वल फलंदाजांनी संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बटलर लीग टप्प्यानंतर राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी त्याच्या मायदेशी रवाना झाला आहे आणि प्ले-ऑफमध्ये संघाला त्याची उणीव भासेल. बटलरच्या पर्याय म्हणून संघाने कुसल मेंडिसचा संघात समावेशआहे, परंतु तो इंग्लंडच्या या स्टार फलंदाजाची पोकळी भरून काढू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.  टायटन्सच्या मधल्या फळीत असलेले शाहरुख खान आणि शेरफेन रदरफोर्ड हे सर्वात विश्वासार्ह खेळाडूंमध्ये नाहीत, ज्यामुळे मुंबईविरुद्ध टायटन्सचा मार्ग सोपा होणार नाही.

 

Web Title: Mi vs gt hardiks mumbai face gills titans in ipl eliminator match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • MI vs GT
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 
1

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या
2

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
3

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
4

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.