MI vs RR: 'Vaibhav should ignore the discussion..', why did Rajasthan coach Rahul Dravid say this? Read in detail..
MI vs RR : आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानकडून गुजरात टायटन्सला पराभूत व्हावे लागले होते. वैभव सूर्यवंशी गुजरातच्या पराभवाचे कारण ठरला होता. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य पूर्ण केले होते. वैभवने फक्त ३५ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याने ७ चौकार आणि ११ षटकार लगावले होते. त्यावेळी क्रिकेटच्या सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक झाले होते. बिहारच्या मुख्यमंत्र्याकडून तर १० लाख रुपये देकहूल देण्यात आले होते. त्याने यूसुफ पठाणचा ३७ चेंडूत शतक झळकवल्याचा विक्रम मोडीत काढला होता. वैभवची होणारी चर्चा यावर राजस्थानचा प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयपीएलसारख्या स्पर्धेत वयाच्या १४व्या वर्षी विक्रमी शतक साकारल्यानंतर तुमच्या नावाची चर्चा होणारच. हेच वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत घडते आहे. तुमच्या खेळाबाबत सातत्याने मत व्यक्त केले जाणार, ही परिस्थिती युवा खेळाडूसाठी निश्चितच अनुकूल नाही. मात्र, काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. तुम्हाला या सगळ्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला. यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासूनच वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. डावखुरा सलामीवीर वैभवने पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सर्वांना अवाक केले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ ३५ चेंडूंत शतक साकारत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे गेले दोन दिवस केवळ वैभवच्याच नावाची चर्चा आहे. द्रविडने स्टार स्पोर्ट्स प्रेस रूममध्ये माध्यमांशी संवाद साधला.
सध्या सर्वत्र वैभवची चर्चा आहे. यापासून आम्ही कोणाला रोखू शकत नाही. वैभवसाठी हे मोठे आव्हान आहे. मात्र, हा अनुभव त्याच्यासाठी रोमांचकही आहे. लहान वयातच त्याच्याकडे इतक्या लोकांचे लक्ष असणे अनुकूल आहे का? निश्चितच नाही. परंतु त्याचे वय आणि त्याची कामगिरी पाहता त्याच्या नावाची चर्चा होणार नाही असा विचार करणे भाबडेपणाचे ठरेल. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही त्याला अधिकाधिक पाठिंबा देण्याचा आणि बाहेरील लोकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे द्रविडने सांगितले.