'मी गर्भवती नाहीये.....'; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी स्टार खेळाडूच्या विधानाने खळबळ, का केले असे वक्तव्य, जाणून घ्या महत्त्वाचे कारण
Mitchell Starc wife Alexi Hill’s Big Statement : Champions Trophy 2025 ही १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरू होणार आहे. ८ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. पण, या स्पर्धेपूर्वी अनेक संघ त्यांच्या खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हादेखील दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला शेवटच्या क्षणी त्यांच्या संघात ५ बदल करावे लागले आहेत.
एलेक्सी हिलने दिले स्पष्ट कारण
यापैकी एक नाव म्हणजे दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कचे. मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. ज्यावर त्याची पत्नी एलिसा हिल, जी स्वतः ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची खेळाडू आहे, हीने एक विधान केले आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तिने आपण मिचेल स्टार्कच्या बाहेर होण्यामागचे कारण नसल्याचे तिने स्पष्टपणे म्हटले आहे.
स्टार्क न खेळण्याबद्दल एलिसा हिलचे मोठे विधान
खरंतर, मिचेल स्टार्कने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे, अॅलिसा हिलदेखील दुखापतीमुळे महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, अशी अटकळ बांधली जात आहे की कदाचित एलिसा हिल गर्भवती आहे आणि स्टार वडील होणार आहे, अशा परिस्थितीत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण एलिसा हिलने या अफवेला पूर्णविराम दिला आहे.
मी त्याच्या बाहेर होण्यामागे कारण नाही
मिचेल स्टार्कच्या संघाबाहेर बोलताना, एलिसा हिलने विलो टॉक पॉडकास्टवर म्हटले, माझ्याकडे पाहू नका. मला माहित नाही, मी अजून त्याला विचारले नाही. तो श्रीलंकेलाही गेला आणि दौऱ्याचा तो टप्पा पूर्ण केला. तर हो, सगळं ठीक आहे. मी ठीक आहे. हेड्स (ब्रॅड हॅडिन) म्हणाला की, मी गर्भवती असू शकते, पण मी खात्री देऊ शकते की मी गर्भवती नाहीये. त्यामुळे त्याच्या बाहेर होण्यामागे माझे कारण नक्कीच नाहीये.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि अॅडम झांपा.
प्रवास राखीव खेळाडू : कूपर कॉनोली