Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी-२० संघातून वगळल्यावर Mohammad Rizwan ने बदलली वाट, पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये दाखवणार कमाल

Caribbean Premier League 2025: मोहम्मद रिझवानला आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता बातमी अशी आहे की तो पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 21, 2025 | 07:27 PM
टी-२० संघातून वगळल्यावर Mohammad Rizwan ने बदलली वाट, पहिल्यांदाच परदेशी लीगमध्ये दाखवणार कमाल
Follow Us
Close
Follow Us:

Caribbean Premier League 2025: आशिया कप २०२५ साठी (Asia Cup 2025) नुकताच पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा झाली, ज्यात मोठे खेळाडू बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना स्थान मिळालं नाही. गेली अनेक वर्षं हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचे मानले जात होते. या निर्णयामुळे नाराज झालेल्या रिझवानने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो लवकरच पहिल्यांदाच एका परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये दिसणार रिझवान

आशिया कपच्या संघातून बाहेर पडल्यानंतर रिझवानने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CPL 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी त्याला सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने करारबद्ध केले आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या जागी तो संघात दाखल झाला आहे, कारण फारुकीला आशिया कपपूर्वी होणाऱ्या त्रिकोणीय टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघात सामील व्हावे लागणार आहे.

Mohammad Rizwan is heading to the CPL for the first time, joining the St Kitts and Nevis Patriots as a replacement player for Fazalhaq Farooqi

Full story: https://t.co/pVQsDrYsP9 pic.twitter.com/VWdYj4oFYj

— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 20, 2025

कर्णधार मोहम्मद रिझवानने पाकिस्तान संघाच्या पराभवासाठी या खेळाडूचं नाव केलं पुढे! म्हणाला- पाचवा गोलंदाज…

पहिल्या परदेशी लीगची सुरुवात

ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मोहम्मद रिझवान CPL मध्ये खेळताना दिसणार आहे. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू यापूर्वी CPL मध्ये खेळले आहेत. या हंगामात मोहम्मद आमिर, इमाद वसीम, नसीम शाह, उसामा मीर, अब्बास अफ्रिदी आणि सलमान इरशाद हेही खेळत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या केंद्रीय करारातील खेळाडूंना दोन परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे CPL ही रिझवानची दुसरी परदेशी लीग आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससोबतही करार केला आहे.

रिझवानची टी-२० कामगिरी

कमी स्ट्राइक रेटच्या समस्येमुळे रिझवानला पाकिस्तानच्या टी२० संघातून वगळण्यात आल्याचे मानले जाते. त्याने पाकिस्तानसाठी १०६ टी-२० सामन्यांमध्ये ९३ डावांत १ शतक आणि ३० अर्धशतकांसह ३,४१४ धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट १२५.३८ एवढा आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून रिझवान कधी मैदानात उतरेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पाकिस्तान संघातून वगळल्यामुळे त्याचा परदेशी लीग खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Mohammad rizwan will play cpl 2025 for the first time after being dropped from the t20 squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 07:26 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Mohammad Rizwan
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी
1

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?
2

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?

IND vs PAK ‘द्विपक्षीय’ सामने होणार नाही; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
3

IND vs PAK ‘द्विपक्षीय’ सामने होणार नाही; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या
4

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.