KKR vs SRH : आज आयपीएल 2024 च्या (IPL 2024) अंतिम सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघांसाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ एकही चूक होऊ नये याच उद्देशाने मैदानात उतरतील. अंतिम सामन्यांमध्ये एकीकडे क्रिकेटचे कुशल रणनीती गुरू गौतम गंभीरचे कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसरीकडे आक्रमक फलंदाजीची नवी व्याख्या निर्माण करणाऱ्या पॅट कमिन्सची सनरायझर्स हैदराबादचा संघ एकमेकांशी लढणार आहेत.
आजचा समान चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. आजचा हा सामना संध्याकाळी 7.30 ला सुरु होणार आहे. या सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल.
[read_also content=”कोलकाता विरुद्ध हैदराबादचा महामुकाबला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार मोफत Online Streaming https://www.navarashtra.com/sports/kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-grand-match-know-when-and-where-to-watch-free-online-streaming-538443.html”]
जाणून घ्या संघाची हेड टू हेड आकडेवारी
दोन्ही संघांमधील ऐतिहासिक प्रतिस्पर्ध्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आघाडी घेतली आहे. त्यांच्या 26 आयपीएल चकमकींपैकी, कोलकाताने 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर हैदराबादने उर्वरित 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
अंतिम सामान्यांच्या खेळपट्टीचा विचार केला तर चेपॉकची खेळपट्टी आळशी आहे. त्यामुळे ही खेळपट्टी स्पिनर आणि गोलंदाजांना अनुकूल ठरते त्याचबरोबर गोलंदाजांना वेग बदलायला मदत होते. त्यामुळे अशा खेळपट्टीसाठी उच्च-स्कोअरिंग सामने पाहणे असामान्य आहे. नाणेफेक जिंकणारे संघ सामान्यत: प्रथम क्षेत्ररक्षण निवडतात, नंतर लक्ष्याचा पाठलाग करण्याचे लक्ष्य ठेवतात. चेपॉकच्या मैदानावर 24 तासांपूर्वी सामना झाला आहे. त्यामुळे दवाचा प्रभाव कमी आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असले तरी, फिरकीपटूंना खेळपट्टीकडून पुरेसा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे फलंदाजांना संयमाने परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक होते.
[read_also content=”‘मी मिताली राजसोबत लग्न करतोय…’ शिखर धवनने केला मोठा खुलासा; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/sports/i-am-marrying-mithali-raj-shikhar-dhawan-made-a-big-revelation-know-what-is-the-whole-matter-nryb-538237.html”]
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
कोलकाता नाईट राइडर्सची संभाव्य प्लेइंग 11
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन