Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video 

गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात एम एस धोनी फलंदाजीसाठी लवकर मैदानात अआला पण त्याला संदीप शर्माने बाद केले. तो बाद होताच एका महिला चाहतीला राग अनावर झाल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 31, 2025 | 02:34 PM
CSK VS RR: MS Dhoni's wicket and the female fan was red-eyed with anger

CSK VS RR: MS Dhoni's wicket and the female fan was red-eyed with anger

Follow Us
Follow Us:

CSK VS RR : आयपीएल 2025 चा थरार आता चांगलाच रंगात येऊ लागला आहे.असाच एक थरारक सामना 30 मार्च रोजी अनुभवायला आला. गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या विजयाने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या. या सामन्यात एमएस धोनी यावेळी लवकर फलंदाजीला मैदानात उतरला. तो सीएसकेला सहज विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण वास्तवात मात्र तसे काही झाले नाही. धोनी लवकरच बाद झाला. त्याच्या विकेटवर चाहत्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसून आले. अशातच त्यातील एका महिला चाहतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 9 गड्यांच्या बदल्यात 183 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यात सीएसके संघ खूप अडचणीत आला होता. त्यानंतर धोनी फलंदाजीला मैदनात आला. तो आला तेव्हा संघाला विजयासाठी 25 चेंडूत 54 धावांची गरज होती. सहसा अशा सामन्यांमध्ये धोनी सामना काढून देण्यात ओळखला जातो. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. संदीप शर्माच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरने त्याचा अफलातून असा झेल घेतला, त्यानंतर धोनीला तंबूत परतावे लागले. या दरम्यान धोनी बाद झाल्यावर एका महिला चाहतीची  प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

 

A CSK fan Girl emotional reaction 🙄( context -Shimron Hetmyer’s stunning catch that dismissed MS Dhoni during the IPL 2025 match between RRvsCSK)
pic.twitter.com/V0bfyyNlDj
— stalker 😈 (@stalker_001R) March 31, 2025

हेही वाचा : एमएस धोनी जखमी? 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण CSK प्रशिक्षक स्टीफन यांनी केले स्पष्ट

धोनी बाद अन् चाहती लालबुंद  झाली..

चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने एमएस धोनीचा अफलातून झेल घेताच कॅमेऱ्यावर एक मुलगी दिसून आली. जी काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. या महिला चाहतीने रागाच्या भरात बोटे देखील मोडली. या महिला चाहतीबाबत आता सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील शेअर होऊ लागले आहेत.

हेही वाचा : MI vs KKR : मुंबई इंडियन्सला अजिंक्य रहाणे होमग्राउंडवर करणार पराभूत? जाणून घ्या कशी असेल वानखेडेची खेळपट्टी

Shimron Hetmeyer took a brilliant catch in the final over to dismiss MS Dhoni and potentially save the match for Rajasthan !! 👏👏#RRvCSK #RRvsCSK pic.twitter.com/AGhS9ZM2cU — Cricketism (@MidnightMusinng) March 30, 2025

सीएसकेचा सलग दूसरा पराभव..

चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2025 मध्ये सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. सीएसके ने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 4 विकेटने पराभव  करत या हंगामची चांगली सुरवात केली होती. परंतु, त्यानंतर आरसीबी आणि काल गुहाटीत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला पराभूत केले. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.

आयपीएल 2025 तील 18 व्या हंगामात 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाने आरआरने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय संपादन केला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या.

 

Web Title: Ms dhonis wicket angers female fan csk vs rr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • bcci
  • CSK VS RR
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.