फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Reason why MS Dhoni bats at number 9 : चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यामध्ये झालेला रोमांचक सामना एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हता. कालच्या सामन्यांमध्ये धोनी मैदानामध्ये सहाव्या विकेटसाठी मैदानात आला होता. आयपीएल २०२५ मध्ये एमएस धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. या फलंदाजीच्या स्थानावर आल्यानंतर धोनीला खूप ट्रोल केले जात आहे. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात माही १६ धावा काढून संदीप शर्माचा बळी ठरला. यापूर्वी, तो आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, त्यानंतर सीएसकेच्या पराभवासाठी त्याला जबाबदार धरले जात आहे.
धोनीच्या फलंदाजीच्या क्रमामुळे ट्रोलर्सनी त्याला लक्ष्य केले आहे. दरम्यान, सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीने ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यामागील कारण उघड केले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर सीएसके संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (एमएस धोनीच्या फलंदाजीच्या स्थानावर स्टीफन फ्लेमिंग) यांनी माध्यमांशी बोलताना धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी का करत आहे याचे कारण स्पष्ट केले. फ्लेमिंग म्हणाले की, धोनीचे गुडघे आता हार मानू लागले आहेत आणि त्याला सलग १० षटके फलंदाजी करणे कठीण झाले आहे. म्हणूनच तो फलंदाजीला येत नाहीये.
‘Dhoni can’t bat 10 overs running full stick’
CSK face a tricky situation with Dhoni the batter
✍️ https://t.co/afD80TYEeA | #IPL2025 pic.twitter.com/t1u0n7gvC5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 31, 2025
स्टीफन पुढे म्हणाले की, “एम.एस. धोनी स्वतः त्याचा फलंदाजीचा क्रम ठरवतो. त्याचे शरीर आणि गुडघे पूर्वीसारखे निरोगी नाहीत. तो व्यवस्थित चालत आहे, पण त्याला काही समस्या येत आहेत. तो पूर्ण १० षटके फलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही. यामुळे, धोनी परिस्थितीनुसार संघासाठी काय करू शकतो याचे मूल्यांकन करतो. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात, तो उंच फलंदाजी करण्यासाठी आला आणि संधी मिळाल्यावर तो इतर फलंदाजांना संधी देत राहतो.”
धोनी आता ४३ वर्षांचा आहे आणि तो फलंदाजी करताना खूप कमी चेंडू खेळतोय. प्रशिक्षक स्टीफन यांनी असेही सांगितले की संघ १३ व्या आणि १४ व्या षटकानंतर धोनीला फलंदाजी करण्यास सांगतो, परंतु तो सामन्याच्या परिस्थितीनुसारच फलंदाजी करण्यास येतो. फ्लेमिंग पुढे म्हणाले की, मी गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक लीडर आहे आणि विकेटकीपिंगच्या बाबतीतही त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्याला नवव्या-दहाव्या षटकात पाठवून तो ते क्वचितच करू शकला असता. तर, १३-१४ षटकांच्या दृष्टिकोनातून पहा, धोनी त्यानुसार कोण कसे खेळत आहे याचे मूल्यांकन करतो?