
Inner Wheel Club of Washim
Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महान खेळाडू होते. त्यांना जगभरात हॉकीचे जादूगर म्हणून ओळखल्या जायचे. त्यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये १९२८, १९३२, १९३६ सलग ३ सुवर्णपदक मिळवून दिले. अशा महान खेळाडूच्या जन्मदिवशी २९ ऑगस्ट रोजी दरवर्षी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातसुद्धा मोठ्याप्रमाणात क्रीडा दिवस साजरा केला.
१०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक कुमारी पूजा पडघान, द्वितीय क्रमांक कुमारी पूनम कांबळे, तृतीय क्रमांक अस्मिता कांचजे हिचा आला. गोळा फेकमध्ये प्रथम क्रमांक पूजा पडघान, द्वितीय क्रमांक प्रणाली खिलारे व विमल खंडारे तसेच तृतीय क्रमांक गायत्री भोयर हिचा आला. रिले रेस मध्ये प्रथम क्रमांक अस्मिता भोयर, अस्मिता कांबळे, नयना भालेराव, द्वितीय क्रमांक नेहा काळे, पूनम कांबळे, साक्षी कांबळे, तृतीय क्रमांक सानिका खंडारे, गायत्री भोयर, प्रणाली खिल्लारे यांचा करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना बक्षीस इनरव्हील क्लब देऊन सत्कार केला जाणार, अशी माहिती व उपस्थित सर्वांचे व इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचे अध्यध रुचिका विसपुते आणि सचिव हेमा विसपुते यांचे विशेष आभार मानले.
वा क्रीडा दिवशी क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळांडूना खेळ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते, तसेच देशातील खोजासाठी देणारा सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने क्रीडा दिनाच्या दिवशी दिला जातो. याप्रसंगी महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ व विद्यार्थिनी उपस्थित होते यानंतर मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये १०० मीटर धावणे, गोजा बैंक, रिते रेस आणि टम अॅड वॉर यांची स्पर्धा फर्स्ट इयर विरुद्ध सेकंड इयर अशी घेण्यात आली.