न्यूझीलंडकडून वेस्ट इंडिजचा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
NZ vs WI : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा ९ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडने २-१ ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा परभव ठरला आहे. वेस्ट इंडिजने मालिकेतील पहिला टी-२० सामना जिंकला, परंतु न्यूझीलंडने पुढील दोन सलग टी-२० सामने जिंकले. न्यूझीलंडसाठी काइल जेमिसन हा या विजयाचा नायकम ठरला आहे.
काइल जेमिसन हा खेळाडू न्यूझीलंडसाठी हुकूमी एक्का ठरला आहे. वास्तविक पाहता त्याने आतापर्यंत तीन टी-२० सामन्यांमध्ये फक्त तीन विकेट घेतल्या, परंतु, त्याने न्यूझीलंडला सलग दोन विजय मिळवून दिले, कारण त्याने शेवटच्या षटकात धावांचे रक्षण केले. वेस्ट इंडिजला तिसरा टी२० सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना रोमारियो शेफर्डचा स्फोटक फॉर्ममध्ये होता, त्याचा फॉर्म पाहता, हे काम फार काही कठीण नव्हते. परंतु, जेमीसन वेगळ्याच लयीत होता. त्याने शेवटच्या षटकात त्या १२ धावांचा बचाव करत वेस्ट इंडिजचा विजय हिसकावून घेतला. या दरम्यान त्याने रोमारियो शेफर्डला देखील बाद केले.
यापूर्वी, दुसऱ्या टी२० सामन्यात, वेस्ट इंडिजने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय शेवटच्या षटकात गमावला, कारण काइल जेमीसन गोलंदाजी करत होता. दुसऱ्या टी२० सामन्याच्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती, परंतु काइल जेमीसनने त्यांना धावा करण्यापासून रोखले. परिणामी, न्यूझीलंडने सामना ३ धावांनी खिशात टाकला.
तिसऱ्या टी-२० सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १७७ धावा उभ्या केल्या होत्या. धावांचा वेस्ट इंडिजचा संघ १९.५ षटकांत १६५ धावांवर गारद झाला. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, कॅरिबियन फलंदाज रोमारियो शेफर्डने ३४ चेंडूत ४९ धावांची खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.






