फोटो सौजन्य - Shubhankar Mishra युट्युब
मोहम्मद शमी : मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यानंतर दुखापतीमुळे गोलंदाज सध्या संघाबाहेर आहे. मोहम्मद शामीचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला होता. शामीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप लावले होते, त्यानंतर बराच काळ शामी क्रिकेटपासून दूर आहे. काही महिन्यांआधी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची घटस्फोटाची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनेकजण मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झा यांचे नाव जोडले जात होते. असेही सांगण्यात येत होती की शामी आणि सानिया दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. यावर आता स्वतः मोहम्मद शामीने या घटनेचा खुलासा केला आहे.
नुकताच एक मोहम्मद शामीची मुलाखत युट्युबवर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने सानिया मिर्झासोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये मोहम्मद शामीला विचारण्यात आले आहे की, सानिया मिर्झा आणि मोहम्मद शामी लग्न करणार आहेत अशा बातम्या पाहिल्यावर राग येतो. यावेळी त्याने सांगितले की, खूप विचित्र आहे हे, जबरदस्ती जोडलं जात आहे हे, फोन उघडला की आपलाच फोटो दिसतो. पण मी यावर एक सांगू इच्छितो की, असं कोणाचंही नाव जोडलं नाही पाहिजे. जर तुम्ही त्यावर मिम्स तुमच्या विनोदासाठी बनवत असाल, पण ते कोणाच्यातरी आयुष्याच्या संबंधित आहे. त्यामुळे ते मिम्स खूप विचार करून बनवले पाहिजे. जे तुम्हाला बनवायचेच आहे तर तुमच्याच दम आहे तर खऱ्या अकाऊंटवरून बनवून दाखवा तेव्हा मी सांगतो असा इशारा त्याने ट्रोलर्सला दिला आहे.
भारताचा फलंदाज मोहम्मद शमी काही वर्षांपूर्वी त्याच्या खासगी जीवनामुळे प्रचंड चर्चेत आला होता. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा वाद सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहान हे दोघे २०१८ मध्ये वेगळे झाले होते. यावेळी मोहम्मद शमीच्या पत्नीने अनेक आरोप खेळाडूवर लावले होते. नुकताच झालेल्या व्हिडिओमध्ये शमीला विचारण्यात आले होते की, तुम्ही तुमच्या मुलीची आठवण येते का? यावेळी शमी म्हणाला की, आठवण तर येत असते कधी कधी मी बोलतो माझ्या मुलीशी असे शमीने सांगितले.