virat kohali : वनडेत विराटचा नवा विक्रम, गाठला15 हजार धावांचा टप्पा,
किंग कोहलीने मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा 15 हजार वनडे धावांचा टप्पा सर्वांत जलद गाठण्याचा विक्रम मोडीत काढला. सचिनने 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 377 डाव घेतले होते, तर विराटने हा टप्पा अवघ्या 303 डावांत गाठला आहे. म्हणजेच त्याने सचिनपेक्षा तब्बल 74 डाव आधी हा विक्रम आपल्या नावे रचला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराटला 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ५९ धावांची गरज होती. त्याने हे लक्ष्य गाठत नवा इतिहास रचला.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अद्याप सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडे कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या आहेत. आता कोहलीच्या खात्यावर १५ हजारांहून अधिक धावा जमा झाल्या आहेत.
किंग कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. गेल्या जवळपास दोन दशकांत त्याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो या प्रकारातील प्रमुख फलंदाजांपैकी एक ठरला आहे. 15 हजार वनडे धावांचा टप्पा गाठत कोहलीने आपल्या विक्रमांच्या यादीत आणखी एका मोठ्या विक्रमाची भर घातली आहे.






