सौजन्य - Arshad Nadeem Olympian Instagramm
Arshad Nadeems meeting with terrorist Hafiz Saeed Gang Member : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम पाकिस्तानात पोहोचल्यावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रत्येकजण भेटण्यासाठी आणि भेट म्हणून काहीतरी देण्यास उत्सुक दिसतो. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा गोल्डनबॉय अमेरिकेने घोषित केलेल्या दहशतवाद्यासोबत भेटताना दिसत आहे. या संपूर्ण संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गोल्ड मेडलीस्ट अर्शद नदीम आणि आतंकवादी मोहम्मद हारिस धर यांच्यात चर्चा
SHOCKING 🚨 Pictures of Pakistan’s Olympic Gold medalist Arshad Nadeem with Lashkar-e-taiba terr0rist Muhammad Harris Dar go viral.
Dar tells Nadeem in viral video that his achievement has made the entire Muslim Ummah proud.
Muhammad Harris Dar is the Joint Secretary of Milli… pic.twitter.com/VDG6ZXeVhd
— Times Algebra (@TimesAlgebraIND) August 13, 2024
दोघांमध्ये बैठक झाल्याचा दावा
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, व्हिडिओमध्ये अर्शद नदीम, मोहम्मद हरिस धर याच्याशी बोलताना दिसत आहे. इंडियन सिक्युरिटी ग्रिडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर हे बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) ची राजकीय आघाडी मिल्ली मुस्लिम लीग (MML) चे संयुक्त सचिव आहेत. नदीम पाकिस्तानात परतल्यानंतर दोघांमधील बैठक झाल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या एका भागाने केला आहे, परंतु सिक्युरिटी ग्रिडच्या सूत्रांनी अद्याप बैठकीच्या वेळेची पुष्टी केलेली नाही.
अर्शदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले
त्याच्या म्हणण्यानुसार, कॅमेऱ्यात कैद झालेले संभाषण अर्शदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी किंवा नंतर घडले याची पुष्टी झालेली नाही. मात्र, या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अशा दहशतवाद्याला भेटेल, अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. व्हिडीओमध्ये हरीश धरदेखील त्यांना वचन देताना दिसत आहे.
हाफिज सईद 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड
उल्लेखनीय आहे की, MML ही हाफिज सईद चालवणारी संघटना आहे, जो 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो, ज्यात 166 लोक मारले गेले होते. 2018 मध्ये, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने MML चेअरमन सैफुल्लाह खालिद, मुझम्मिल इक्बाल शशिमी, हरीस धर, ताबीश कय्युम, फय्याज अहमद, फैसल नदीम आणि मोहम्मद एहसान यांच्यासह 7 विशेष नियुक्त केलेल्या जागतिक दहशतवाद्यांची नावे दिली होती. त्यांच्यावर लष्करासाठी काम केल्याचा आरोप आहे.