फोटो सौजन्य - IndianPremierLeague
SRH vs MI : आयपीएल २०२५ चा ४१ वा लीग सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने मागील तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता तर मागील सीझनचा उपविजेता संघ हैदराबादच्या संघाने या सीझनमध्ये खराब कामगिरी केली आहे त्यामुळे संघ सध्या नवव्या स्थानावर आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
या सामन्यात, दोन्ही संघांचे खेळाडू पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील Pahalgam Terror Attack बळींना शोक व्यक्त करण्यासाठी सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधतील. या सामन्यात कोणतेही चीअरलीडर्स नसतील आणि आतषबाजीही होणार नाही. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, तुम्हाला डीजेवरही गाणी ऐकू येणार नाहीत. या घटनेत बाधित झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ एक मिनिटाचे मौन पाळणार आहेत. या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला आहे.
रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ
“दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून खेळतील आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळतील,” असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राने पीटीआयला सांगितले. मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान कोणतेही चीअरलीडर्स नसतील. “फटाके फोडले जाणार नाहीत.” डीजेचा वापर फक्त स्कोअरिंगसाठी केला जाऊ शकतो.
बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींसोबत एकता व्यक्त करत आहे. या भयानक हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना…
Standing in solidarity with the victims of the Pahalgam terror attack. Prayers for the families who lost their loved ones in this gruesome attack 💔 pic.twitter.com/KXAJelZ1n3 — BCCI (@BCCI) April 23, 2025
दक्षिण काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी लोकांवर केलेल्या गोळीबारात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानात स्थित असलेल्या आणि बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे त्याचबरोबर या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले आणि अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देशाचा दौरा करण्यास नकार दिला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दुबईमध्ये तटस्थ स्थळ देण्याची तरतूद करावी लागली. येत्या काळात बीसीसीआय आणखी काही कठोर निर्णय घेऊ शकते.






