उस्मान तारीक(फोटो-सोशल मिडिया)
PSL 2025 : भारतात आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा थरार सुरू आहे, तर आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये पीएसएल२०२५ ची लीग सुरू आहे. भारतात आतापर्यंत आयपीएलचे ३० सामने खेळवण्यात आले असून पीएसएलची मात्र अजून पहिल्याच टप्याला सुरवात झाली आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. बऱ्याच वेळा चुकांमुळे चर्चेत राहिल्याचे दिसून येते. यावेळी, एका गोलंदाजामुळे, जगभरात पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी लीग ही सध्या तरी आयपीएलच्या जवळपास देखील नाही. अशातच आता एका गोलंदाजाच्या चुकीमुळे पीएसएल चर्चेत आली आहे.
हेही वाचा : LSG vs CSK : ‘एक संघ म्हणून, मी प्रत्येक…’ सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचे खळबळ माजवणारे विधान्
पाकिस्तान सुपर लीग २०२५ च्या सामन्यात क्वेटाचा फिरकी गोलंदाज अडचणीत आला आहे. त्याच्या या समस्येमागील कारण त्याची गोलंदाजी ठरली आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान पंचांनी त्याची कृती संशयास्पद असल्याचे घोषित केले. याची सविस्तर बातमी अशी आहे की, या खेळाडूवर पूर्णपणे बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. खरंतर, रावळपिंडीच्या खेळपट्टीवर क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहौल कलंदर्स यांच्यात सामना रंगला होता. सामन्यादरम्यान उत्साह शिगेला पोहोचला असताना मैदानाबाहेर एक नवीनच कहाणीने पुढे आली.
रविवार १३ एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या क्वेटा आणि लाहोर यांच्यातील सामन्यानंतर, मैदानावरील पंच एहसान रझा आणि ख्रिस ब्राउन यांनी उस्मान तारिकची गोलंदाजीची कृती संशयास्पद असल्याचे घोषित केले, परंतु, या सामन्यात तारिकने त्याचे पूर्ण चार षटके टाकली. हे याआधी देखील २०२३ मध्ये उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर क्वेटाने स्वतःच्या इच्छेने त्याला संघातून बाहेर काढून टाकले होते. यानंतर, ऑगस्टमध्ये, लाहोरमधील आयसीसी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेने त्याची कृती कायदेशीर असल्याचे घोषित केले होते.
हेही वाचा : LSG vs CSK : थालाच्या वेगाची २०० वी शिकार, बदोनीचा बळी अन् धोनी बनला जगातील ‘खुंकार’ शिकारी..पहा व्हिडिओ
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली, पीसीबीकडून सांगण्यात आले आहे की, “नियमांनुसार, उस्मान तारिक पीएसएलच्या आगामी सामन्यांमध्ये गोलंदाजी सुरू ठेवू शकतो. तथापि, जर त्याचे पुन्हा रिपोर्ट काही गैर आढळले तर त्याला गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात येईल आणि पुन्हा खेळण्यासाठी त्याला आयसीसी मान्यताप्राप्त लॅबकडून परवानगी मिळवावी लागेल.”
काल म्हणजेच सोमवार रोजी (१४ एप्रिल) आयपीएल २०२५ मधील ३० वा सामाना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध सीसके यांच्यात खेळवण्यात आला आहे. नाणेफेक गामावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात सीएसकेने तीन चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला.