महेंद्रसिंग धोनी आणि आयुष बदोणी(फोटो-सोशल मिडिया)
LSG vs CSK : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३० सामने खेळवण्यात आले आहे. काल ३० वा (१४ एप्रिल) सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. एकाना स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सीएसकेने एलएसजीला पराभवाचा सामाना करायला भाग पाडले. चेन्नईने सलग ५ सामन्यात पराभव पत्करला असताना कालच्या सामन्यात मिळवलेला विजय चेन्नईसाठी सुखावणारा ठरला आहे. चेन्नईने लखनौला ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जादू बघायला मिळाली. त्याने एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
चेन्नईचा कर्णधार असणाऱ्या ४३ वर्षीय धोनीवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात असून त्याला ट्रॉल देखील करण्यात येत आहे. त्याच्या फॉर्मबद्दल अनेक दिग्गजांनी त्याच्यावर थेट टीका केली आहे अथवा करत आहेत. काहींनी तर त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. परंतु धोनीला टिकाकारांची तोंडे बंद करण्याची कला अवगत आहे. तो आपल्या कामगिरीने ते काम करत असतो. यावेळी देखील त्याने असेच काही केले आहे. लखनौविरुद्ध त्याने बडोणीचा बळी घेताच आयपीएलच्या इतिहासात आजवर जे कुणी केले नाही ते करुन दाखवले आहे.
हेही वाचा : IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ
या बाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र जडेजाच्या षटकात आयुष बदोनी क्रीजपासून थोडा दूर जाताच धोनीने संधी साधून धोनीने एक शानदार स्टंपिंग करून त्याला तंबूचा रस्ता दाखवला. असे करताच त्याने आयपीएलमध्ये त्याचे २०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा धोनी हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
Dunnit 2️⃣0️⃣0️⃣ times over! ⚡️🙌🏻#LSGvCSK #WhistlePodu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2025
हेही वाचा : LSG vs CSK : हे केवळ धोनीच करू शकतो..! ‘थाला मॅजिक’ने एलएसजीचा फलंदाज वाईड बॉलवर माघारी.., पहा व्हिडिओ
चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच्या हातात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.