महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत(फोटो-सोशल मिडिया)
LSG vs CSK : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगामातील काल ३० वा (१४ एप्रिल) सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला होता. एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून या सामन्यात सीएसकेने एलएसजीला पराभूत केले आहे आहे. या हंगामात चेन्नईला सलग ५ सामन्यात पराभव पत्करला लागला आहे. तर एलएसजीने या हंगामात ७ समाने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल चेन्नईने लखनौला ५ विकेट्सने पराभूत केले. पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत खूप नाराज असल्याचे दिसून आले.
सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात कर्णधार रुषभने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, ‘एक संघ म्हणून आम्ही १०-१५ धावांनी नक्कीच कमी पडलो. जेव्हा आम्ही फॉर्ममध्ये होतो तेव्हा आम्ही नियमित अंतराने विकेट गमावत गेलो. आम्हाला चांगली भागीदारी निर्माण करायची होती. तसेच विकेट देखील काही काळ थांबल्यासारखे वाटत होते. पण आम्हाला अधिक १५ धावांची गरज होती.’
हेही वाचा : LSG vs CSK : थालाच्या वेगाची २०० वी शिकार, बदोनीचा बळी अन् धोनी बनला जगातील ‘खुंकार’ शिकारी..पहा व्हिडिओ
एलएसजीचा कर्णधार पंत पुढे म्हणाला की, ‘प्रत्येक सामन्यानंतर मला चांगले वाटते, पण कधीकधी ते दिसून येत नाही. मी माझ्या फॉर्ममध्ये हळूहळू परत येत आहे. मी सर्व सामने सारखेच बघत आहे. मी अनेक खेळाडूंशी बोललो. आम्ही शेवटपर्यंत बिश्नोईला गोलंदाजी लारायला लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज ते शक्य झाले नाही. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे ही आमच्यासाठी एक समस्या राहिली आहे. पण आम्ही ती नक्की सोडवणार आहोत. एक संघ म्हणून, मी प्रत्येक सामना हा सकारात्मकतेने घेत असून त्यात सुधारणा करत आहे.
काल म्हणजेच सोमवार रोजी (१४ एप्रिल) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध सीसके सामाना खेळवण्यात आला. नाणेफेक गामावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात सीएसकेने तीन चेंडू शिल्लक ठेवत विजय नोंदवला.
हेही वाचा : IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.