फोटो सौजन्य - tasvafashion
पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या तिरंदाजांनी २५ जुलै रोजी पॅरिसमध्ये श्रीगणेशा केला आहे. आज पॅरिस ऑलिम्पिकचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतामध्ये रात्री ११ पासून सुरु होणार आहे. भारताचा क्रमांक यंदा ८४ व्या नंबरला असणार आहे. या सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण JIO Cinema वर दाखवण्यात येणार आहे. यंदा पॅरिसमध्ये १०,५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. यावेळी ३२९ पदकांची स्पर्धा होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतातील एकूण ११७ खेळाडू १६ खेळांमधील ६९ पदक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.
भारतीय पुरुष कुर्ता बंदी सेटमध्ये दिसणार आहेत आणि महिला भारताच्या तिरंगा ध्वजाचे चित्रण करणाऱ्या साड्यांमध्ये दिसतील. पारंपारिक इकत-प्रेरित प्रिंट्स आणि बनारसी ब्रोकेडने सजलेले हे पोशाख तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले आहेत.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक डबल मेडलिस्ट पीव्ही सिंधू, टेबल टेनिसचा दिग्गज शरत कमलही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा सहभागी झाली आहे. त्याचबरोबर ती तिसऱ्या ऑलिम्पिकच्या पदकाच्या शोधात आहे. पीव्ही सिंधू आणि शरथ कमल पॅरिस ओपन २०२४ च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे नेतृत्व करतील. ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन समारंभात भारतीय ध्वज घेऊन जाणारे हे दोघेही आपापल्या खेळातील पहिले खेळाडू असतील.