फोटो सौजन्य - JIO Cinema/सोशल मीडिया
पॅरिस परालिम्पिक २०२४ : पॅरिस परालिम्पिक २०२४ चा कहर जगभरामध्ये सुरू आहे, भारताचे ॲथलेटिक्स कमालीची कामगिरी स्पर्धेमध्ये करत आहेत. पॅरिस परालिम्पिक २०२५ च्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी दिवस हा भावनिक राहिला. कारण भारताच्या खेळाडूंनी दोन पदकांची कमाई केली, परंतु भारताचे पॅरा तिरंदाज राकेश कुमार यांचे कांस्यपदक १ पॅाइंटने हुकले. १ सप्टेंबर रोजी भारताच्या खेळाडूंनी कशा प्रकारे कामगिरी केली आहे, यावर एकदा नजर टाका.
भारताची पॅरा बॅडमिंटनपटू आणि वर्ल्ड नंबर दोन मनिषा रामदास हीने जपानची बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या विजयासह तिने भारतासाठी मेडल देखील पक्के केले आहे. त्यानंतर तिची लढत वर्ल्ड नंबर एक तुलसीमथी मुरुगेसन सोबत झाला. यामध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताची पॅरा धावपटू प्रीती पालने १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये मेडल मिळवून ट्रॅक ॲथलेटिक्समध्ये मेडल मिळवणारी पहिली महिला ठरली. पॅरिस परालिम्पिकच्या चौथ्या दिनी २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रीती पालने पॅरिसमध्ये दुसरे पदक नावावर केले आहे.
पॅरिस परालिम्पिकमध्ये भारताचे दोन पॅरा शटलर सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडले. यावेळी सुहास यथिराजयाने २१-१७ आणि २१-१२ असा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर सुकांत कदम हा कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
भारताचे पॅरा तिरंदाज राकेश कुमार यांचा चीनचा तिरंदाज यांच्याविरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचा सामना चीनच्या हि झिहाव या तिरंदाजाशी झाला यामध्ये त्यांचे एक पॉईंट मुळे मेडल हुकलं.
भारताचा पॅरा ॲथलेटिक्स निषाद कुमारने उंच उडी T३७ या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत भारताला सातवे मेडल मिळवून दिले आहे. टोकियो परलिंपिक् २०२० मध्ये निषाद कुमारने सिल्वर मेडल मिळवले होते, यावेळी त्याने हे दुसरे मेडल नावावर केले आहे.