Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB : आज अय्यरसेना आणि पाटीदारसेनेते महामुकाबला! अशी असेल, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११

आज, गुरुवारी, इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 29, 2025 | 12:41 PM
PBKS vs RCB: Today's Iyyar Sena and Patidar Sena clash! This will be the possible playing 11 of both the teams.

PBKS vs RCB: Today's Iyyar Sena and Patidar Sena clash! This will be the possible playing 11 of both the teams.

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB : आज, गुरुवारी, इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.  हा सामना देखील अटीतटीचा होणार असल्याचे मानले जाता आहे. कारण, दोन्ही संघ फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली आहे.

आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना मुल्लानपूरच्या मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना आरसीबीसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच पंजाबसाठी देखील  महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक मारणार आहे. जो संघ पराभूत होईल त्याला एक सामना अधिक खेळायला मिळणार आहे. तर चला दोन्ही संघांचे रेकॉर्डबद्दल माहिती घेऊया.

हेही वाचा : PBKS vs RCB : IPL च्या क्वालिफायर आणि एलिमिनेटरपूर्वी पंजाब पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था; मॉक ड्रिलही केले..

क्वालिफायर-१ मधील आरसीबीचा रेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकदा देखील क्वालिफायर-१ सामना  खेळलेला नाही. तथापि, संघाने दोनदा क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश मिळवला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवता आला नाही.

पीबीकेएसचा क्वालिफायर-१ मध्ये रेकॉर्ड

तर दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जने एकदा क्वालिफायर-१ खेळलेला आहे. २०१४ मध्ये, संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत झाला होता, जिथे केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते.  या अर्थाने, क्वालिफायर-१ मध्ये संघाचा विजयाचा टक्का १०० आहे, जो आरसीबीच्या संघाला घाबरवण्यासाठी पुरेसा ठरणारा आहे.

दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात जेव्हा केव्हा आरसीबी आणि पंजाब किंग्ज समोरासमोर आले आहेत, तेव्हा सामना खूपच रोमांचक झाला आहे. दोन्ही संघ चांगली लढत देतात. यामुळेच हेड टू हेडच्या बाबतीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब आणि बंगळुरू एकूण ३५ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने १८ सामने जिंकून आघाडी मिळवली आहे, तर आरसीबीने १७ सामने खिशात टाकले आहेत.  तथापि, गेल्या ५ सामन्यांमध्ये बंगळुरूने ४ वेळा पंजाबचा धुव्वा उडवला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : Suryakumar Yadav ने केली ‘निवृत्ती’ ची पोस्ट, चाहत्यांना धक्का! सोशल मीडियावर उडाली खळबळ, पण सत्य…

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल सॉल्ट, विराट कोहली, टीम सेफर्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, जोश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल.

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक/युजवेंद्र चहल

 

Web Title: Pbks vs rcb todays iyyar sena and patidar senes big clash possible playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • IPL 2025
  • PBKS vs RCB
  • Rajat Patidar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
2

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
3

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.