IPL च्या क्वालिफायर आणि एलिमिनेटरपूर्वी पंजाब पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था(फोटो-सोशल मीडिया)
PBKS vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना २९ आणि ३० मे रोजी पंजाबमधील मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिला क्वालिफायरमध्ये आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू ही संघ आमनेसामने असणार आहेत. पंजाब पोलिसांनी या सामन्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. पंजाब पोलिसांनी या सामन्याशी संबंधित सर्व तयारी पूर्ण झाल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
पंजाब पोलिसांकडून बुधवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव असून देखील आयपीएलच्या आगामी क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ज्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक बदलण्यात आले होते.
हेही वाचा : PBKS vs RCB Qualifier 1 : आज पंजाब साधेल सरशी की बंगळुरू पडेल भारी? जाणून घ्या सामन्याची A टू Z माहिती..
सुधारित वेळापत्रकानुसार, आता पहिला क्वालिफायर गुरुवारी आणि एलिमिनेटर शुक्रवारी पंजाबमधील मुल्लानपूर येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याच वेळी, क्वालिफायर-२ आणि अंतिम सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी अहमदाबाद येथे आणि अंतिम सामना ३ जून रोजी होणार आहे.
पंजाबचे विशेष पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी सांगितले आय, उद्या आणि परवा मुल्लानपूर येथे दोन अत्यंत महत्त्वाचे सामने आयोजित केले जाणार आहेत, एक क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर. देशभरातून प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्यात खूप उत्साह दिसून येत आहे.
पुढे शुक्ला म्हणाले कि, प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियममधील आणि आजूबाजूच्या सुरक्षा व्यवस्थेचे पूर्णपणे मूल्यांकन केले गेले आहे. सुरक्षेसाठी सुमारे ६५ वरिष्ठ अधिकारी आणि २,५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आमचा प्रयत्न आहे की कोणत्याही पाहुण्याला कोणतीही गैरसोय भासू नये आणि सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे राबवल्या जाव्यात.
हेही वाचा : IPL 2025 : Suryakumar Yadav ने केली ‘निवृत्ती’ ची पोस्ट, चाहत्यांना धक्का! सोशल मीडियावर उडाली खळबळ, पण सत्य…
सुरक्षा तयारीचा भाग म्हणून मॉक ड्रिल रिहर्सल देखील करण्यात आले आहे. याबाबत देखील माहिती डीजीपी यांनी दिली. काल एक मॉक ड्रिल घेण्यात आली आणि आजही पोलिस दलाकडून सराव करण्यात येत आहे. जेणेकरून आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असणार आहोत.