ENG vs AUS T20 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 13 सप्टेंबर रोजी सोफिया गार्डन्स क्रिकेट ग्राउंड, कार्डिफ येथे खेळला गेला. इंग्लंडने हा सामना ३ विकेटने जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सवर 193 धावा केल्या. इंग्लंडने 19 षटकांत 3 गडी राखून 194 धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर फिल सॉल्टने आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, त्याने एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला लागोपाठ 3 चेंडूत 3 षटकार ठोकले. या क्षणाचा व्हिडिओ स्वतः इंग्लंड क्रिकेटने ट्विटरवर शेअर केला आहे.
फिल साॅल्टची षटकारांची हॅट्रीक
Back-to-back-to-back maximums from Salty! 💪
Live clips: https://t.co/zd6mj52hLC
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/cEjuyr68Dk
— England Cricket (@englandcricket) September 13, 2024
फिल सॉल्टने ॲरॉन हार्डीचा सामना
ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंड संघाच्या डावातील तिसरे ओव्हर ॲरॉन हार्डी टाकत होता. त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूपासून फिल सॉल्ट स्ट्राइकवर होता. पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. पण यानंतर सॉल्टने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मिड-विकेटवर षटकार ठोकला. ॲरॉनने तिसरा चेंडूही शॉर्ट टाकला, जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर फिल सॉल्टने मारला आणि 6 धावा केल्या. षटकातील चौथा चेंडू हार्डीने टाकला. या चेंडूवर सॉल्टने थेट बॅटमधून षटकार मारला. अशाप्रकारे इंग्लंडने डावाच्या तिसऱ्या षटकात 21 धावा केल्या.
सॉल्टची तुफानी खेळी
28 वर्षीय फिल सॉल्टने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी देताना 169 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 23 चेंडूत 39 धावा केल्या. या छोट्या पण आक्रमक खेळीत सॉल्टने 2 चौकार आणि 3 षटकारही लगावले. याशिवाय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने दुसरी टी-२० जिंकल्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पाहुण्या टीम ऑस्ट्रेलियाने पहिला T20 28 धावांनी जिंकला होता. आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना 15 सप्टेंबर रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे.