PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा झटका! (Photo Credit- X)
पीएसएलच्या वेळापत्रकानुसार 28 मार्च रोजी पेशावरमध्ये एक महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. पेशावर हे शहर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असल्याने तिथे दहशतवादी हल्ल्याचा किंवा युद्धाचा मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. पेशावर झल्मी आणि रावळपिंडी यांच्यातील या सामन्यात अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. विशेषतः अॅरॉन हार्डी (पेशावर) आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क (रावळपिंडी) यांसारखे स्टार खेळाडू या संघात आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या खेळाडूंना पेशावरला प्रवास न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
🚨 NO AUSTRALIAN PLAYERS IN PSL 2026 !! 🚨 “Australia government warned players to not travel Pakistan amid ongoing Air strike in Afghanistan for PSL 2026 Season ”(Code Sports ) — Now ,Pakistan ex players will start new ” Randi Rona ” 🤯 over IPL pic.twitter.com/A8UuB7MF0Q — Kiara (@crickiara) March 17, 2026
‘कॅच इट’! ‘हीट मॅन’चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral
दरम्यान, पीएसएल २०२६ रद्द होणार असल्याच्या चर्चांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, परदेशी खेळाडूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर परिस्थिती अधिक खालावली, तर खेळाडूंना तातडीने खासगी विमानाने सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,” असे पीसीबीने स्पष्ट केले. तसेच, अद्याप कोणत्याही खेळाडूने स्पर्धेतून अधिकृतरीत्या माघार घेतली नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
यंदाच्या पीएसएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे मोठे खेळाडू प्रथमच सहभागी होत आहेत. आयपीएल 2026 (IPL) मध्ये ज्या खेळाडूंना फ्रँचायझींनी पसंती दिली नाही, असे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन यांसारखे दिग्गज खेळाडू पीएसएलमध्ये खेळणार आहेत. जर ऑस्ट्रेलियन सरकारने खेळाडूंना पाकिस्तानातून परत बोलावले किंवा खेळाडूंनी स्वतःहून नाव मागे घेतले, तर पीएसएलच्या प्रतिष्ठेला आणि लोकप्रियतेला मोठा धक्का बसू शकतो.
पाकिस्तानसाठी ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, सीमेवरील तणावामुळे परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता ऑस्ट्रेलियन खेळाडू सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून खेळणार की मायदेशी परतणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा! IPL बाबत कर्नाटक सरकारचा ‘हा’ निर्णय






