Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB Final Match : IPL च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि आरसीबी करणार दोन हात; विजेतेपदाचा दावेदार कोण? जाणून घ्या.. 

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाच्या विजेतेपदाचा महामुकाबला उद्या ३ जून पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यास प्रयत्नशील असणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 07:39 PM
PBKS vs RCB Final Match: Punjab Kings and RCB will clash in the final match of IPL; Who is the contender for the title? Find out..

PBKS vs RCB Final Match: Punjab Kings and RCB will clash in the final match of IPL; Who is the contender for the title? Find out..

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा महामुकाबला उद्या ३ जून रोजी खेळवण्यात येणारा आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आरसीबीने चालू हंगामात शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जनेही आपल्या दमदार खेळाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे.  परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांना आरसीबीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, क्वालिफायर २ मध्ये पंजाबने मुंबईचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : विजेतेपदासाठी पंजाबचा ‘हा’ गोलंदाज Virat Kohli साठी अडचणीचा, ठरतो दरवेळी डोकेदुखी..

या सामन्यात अय्यर आणि कंपनीने हार्दिक पंड्याच्या टीमला ज्या पद्धतीने पराभूत केले आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या ताफ्यात खळबळ उडाली असणार आहे. आता आपण आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील आयपीएल इतिहासातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल माहिती घेऊया.

 आयपीएलमधील हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामन्यात बाजी मारली आहे तर त्याच वेळी, पंजाब किंग्जने देखील तेवढेच १८ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान पातळीवर  आहेत. अशा परिस्थितीत, आता आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात दोघांमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात एकूण तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान, पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बेंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. त्याच वेळी, त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने अय्यरच्या संघावर दबदबा राखत त्यांचा पराभव केला आहे. एका सामन्यात बंगळुरूने ७ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात एकूण ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : आयपीएल फायनलपूर्वी Virat Kohli ला मोठा झटका! बेंगळुरूमध्ये करण्यात आली कारवाई…

पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीच बॉस..

आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या दरम्यान आरसीबीने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला होता. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले होते. त्यानंतर पंजाब किंग्जचा संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर बंगळुरूने छोटेखानी लक्ष्य १० षटकांत पूर्ण करून विजय मिळवला होता. या विजयासह  आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

Web Title: Punjab kings and rcb face off in the final match of ipl who is the contender for the title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.