फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध श्रीलंका ; भारताच्या संघाने महिला T२० विश्वचषकामध्ये पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावल्यानंतर संघाने दमदार कमबॅक केला आहे. भारताच्या संघाने हरमनप्रीत नेतृत्वाखाली तीन सामान्यांमधील दोन सामने जिंकले आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या सामान्यांच्या पराभवानंतर संघाने सलग दोन सामने जिंकले आहेत. भारताच्या संघाने विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत केलं. तर ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या T२० विश्वचषक २०२४ च्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघाने श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभूत केलं आहे. आता त्यामुळे भारतीय संघाने गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. भारताच्या संघाचा सामना झाल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सामन्यामध्ये चांगली फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना मेडल दिले जाते हे मेडल भारत श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कोणाला मिळाले यावर एकदा नजर टाका.
भारत बांग्लादेश सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक झळकावले. त्यानंतर तीला विश्रांती हवी त्यासाठी कॅप्टन कौरच्या जागेवर राधा यादवला फिल्डिंगसाठी मैदानात बोलावले होते. यावेळी रेणुका ठाकूरच्या ओव्हरने अविश्वसनीय पहिलाच कॅच तिने घेतला आणि संघाला पहिला विकेट मिळवून दिला. भारताच्या संघाने कालच्या सामन्यामध्ये ९ कॅच घेतले. यामध्ये दमदार कामगिरी करून भारताने ८२ धावांनी विजय मिळवला. राधा यादव संघाला चांगली सुरुवात करून दिली, त्याचबरोबर सामन्यातील सर्वात कठीण कॅच पकडून मेडलवर कब्जा केला आहे.
भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील शेवटचा सामना १३ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. भारतीय महिला संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे, त्याचबरोबर आव्हानात्मक देखील असणार आहे. महिला टीम इंडियाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यत एकही सामना हरलेला नाही त्यामुळे भारताच्या संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा सामना १३ ऑक्टोबर खेळवला जाणार आहे. या सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे.