Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs MI: पराभव लागला हार्दिक पंड्याच्या जिव्हारी! म्हणाला, ‘त्यांनी तर आम्हाला…’, फोडले बॉलर्सवर खापर

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने अवघ्या पाच षटकांत ८० धावा जोडून राजस्थानचा विजय निश्चित केला. MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या पराभवासाठी आपल्या गोलंदाजांना जबाबदार धरले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 08, 2026 | 10:36 AM
हार्दिक पांड्या भडकला, बॉलर्सवर फोडले पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - Instagram)

हार्दिक पांड्या भडकला, बॉलर्सवर फोडले पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सकडून दारूण पराभव 
  • हार्दिक पांड्या गोलंदाजांवर भडकला
  • वैभव आणि यशस्वीची केली स्तुती 
राजस्थान रॉयल्सकडून एकतर्फी पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या काल रात्री संतापला होता. आयपीएल २०२६ मधील आपला पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव होता. पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात २७ धावांनी पराभव पत्करल्यानंतर हार्दिकने गोलंदाजांवर जोरदार टीका केली. मुंबईचा कर्णधार म्हणाला की, गोलंदाजांनी जबाबदारी घेतली पाहिजे.

पावसामुळे सामन्याची सुरुवात दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आली होती. पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला. सामनावीर यशस्वी जैस्वाल (३२ चेंडूत ७७ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (१४ चेंडूंत ३९ धावा) यांनी मुंबईच्या गोलंदाजांना जोरदार झोडपले आणि सामना राजस्थानच्या खिशात घातला. 

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव

सामन्यानंतरच्या सादरीकरणात पांड्या काय म्हणाला?

पॉवरप्लेमध्ये आम्ही जसे चेंडू टाकायला हवे होते तसे टाकले नाहीत. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर चांगले खेळले. गोलंदाजांनी जबाबदारी घेतली पाहिजे. एक गोलंदाजी गट म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली नाही. मी या पराभवासाठी फलंदाजीला दोष देणार नाही. गोलंदाजी विभागाने जबाबदारी घ्यायला हवी होती. नेहमी चांगले चेंडू टाकणे महत्त्वाचे असते. जर आम्ही व्यवस्थित गोलंदाजी केली असती, तर आम्ही सामन्यात टिकून राहिलो असतो.

पांड्याने वैभव सूर्यवंशीचे भरभरून कौतुक केले

सूर्यवंशीबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, “१५-१६ वर्षांचा मुलगा अशाप्रकारे खेळतो हे खूपच रंजक आहे. त्याची फलंदाजी आणि निर्भयता पाहून खूप आनंद होतो. त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.” पुढील सामन्याबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, “आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायला हवे. उद्याची सकाळ पुन्हा येईल, सूर्य उगवेल, आपल्याला पुढील सामन्यासाठी चांगली तयारी करावी लागेल.”

नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?

राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानी

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, जैस्वाल-सूर्यवंशी ही जोडी स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. तो म्हणाला, “दोघांनाही वयाचा फायदा आहे. वैभव अप्रतिम आहे. जयस्वाल गेल्या ३-४ वर्षांपासून हे करत आहे. त्याच्याकडे कौशल्य आणि परिपक्वता आहे. तो सर्वोत्तम आहे.” नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने ११ षटकांत तीन गडी गमावून १५० धावा केल्या आणि त्यानंतर मुंबईला १२३/९ धावांवर रोखले. या २७ धावांच्या विजयासह राजस्थानने आपला सलग तिसरा सामना जिंकला आणि सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

Web Title: Rajasthan royals beats mumbai indian by 27 runs hardik pandya criticising bowlers after loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • MI vs RR
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
3

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन
4

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.