Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs RR: सावधान! राजस्थानचे ‘हे’ ५ शिलेदार CSK साठी डोकेदुखी; वैभव सूर्यवंशी करणार गेम

Vaibhav Suryavanshi: चेन्नईचा संघ आज एम.एस.धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. आयपीएल 28 मार्चपासून सुरू झाले आहे. आज आयपीएलचा तिसरा सामना होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 03:18 PM
CSK Vs RR: सावधान! राजस्थानचे ‘हे’ ५ शिलेदार CSK साठी डोकेदुखी; वैभव सूर्यवंशी करणार गेम
Follow Us
Follow Us:

आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना 
वैभव सूर्यवंशीकडे खिळल्या सर्वांच्या नजरा 
एम.एस धोनी आज खेळणार नसल्याने चिंता

Tata IPL 2026 CSK Vs RR Live: आज आसामच्या गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. चेन्नईचा संघ आज एम.एस.धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. आयपीएल 28 मार्चपासून सुरू झाले आहे. आज आयपीएलचा तिसरा सामना होणार आहे. दरम्यान राजस्थानचे काही खेळाडू चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकतात. तर हे खेळाडू नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.

1. वैभव सूर्यवंशी: वैभव सूर्यवंशी आज चेन्नईच्या गोलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. पहिले 6 ओव्हर्स जे पॉवरप्लेचे असतात, त्यामध्ये वैभव सूर्यवंशीने फटकेबाजी केली तर राजस्थान रॉयल्स मोठी धावसंख्या उभारू शकते. मागील हंगामात वैभवने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे.

2. यशस्वी जयस्वाल: यशस्वी जयस्वालला वेगवान गोलंदाजीवर फलंदाजी करण्यास आवडते असे म्हटले जाते. चेन्नईच्या गोलंदाजांसाठी हा डावखुरा फलंदाज डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. यशस्वीने चेन्नईविरुद्ध 266 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतके लगावली आहेत.

3. शिमरोन हेटमायर: शिमरोन हेटमायर अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने चांगली खेळी केली होती. दरम्यान हा खेळाडू देखील चेन्नईच्या गोलंदाजांसाठी घातक ठरू शकतो.

4. रवींद्र जाडेजा: रवींद्र जाडेजा चेन्नई सुपर किंग्स गहेळी अनेक वर्षे खेळत आहे. मात्र यंदा तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. आपल्या उत्तम गोलंदाजीच्या कौशल्यावर आणि आणि आक्रमक आणि संघाला आवश्यकता असेल तशी फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. जाडेजाला चेन्नईच्या संघाची माहिती असल्याने तो आज चेन्नईसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.

MI vs KKR : पुन्हा एकदा Mumbai Indians मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात! Toss च्या वेळी का फिरवला कॅमेरा? सोशल मिडियावर रंगली चर्चा

चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात

धोनीसोबतच, सीएसकेला त्यांचा युवा स्फोटक फलंदाज, देवाल्ड ब्रेविस याच्याशिवाय खेळावे लागेल, जो बरगडीच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे सीएसकेसमोर एक मोठे आव्हान उभे राहू शकते. पाच वेळचा चॅम्पियन संघ राजस्थानविरुद्ध कोणता प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवू शकतो, हे आता आपल्याला कळले आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ खूपच तरुण दिसतो, विशेषतः त्यांची फलंदाजीची फळी मजबूत आहे.

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

राजस्थान संघात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर आहेत, तसेच शिमरॉन हेटमायर, रियान पराग आणि दसुन शनाका यांसारखे खेळाडूही आहेत. खरे तर, दोन्ही संघांची फलंदाजी चांगली दिसत आहे, पण त्यांची गोलंदाजी थोडी कमकुवत वाटते. सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. गोलंदाजी जेवढी चांगली, तेवढी विजयाची शक्यता जास्त.

 

Web Title: Rajsthan royals vaibhav suryvanshi yashsvi jaiswal danger to csk today ipl 2026 match in guwahati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • RR vs CSK
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
1

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
2

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
3

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
4

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.