Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

Ravindra Jadeja scripts history score 4000 runs and 350 wickets: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दोन विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा गाठला. यासह त्याने कपिल देवच्या यादीत स्थान मिळवले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 17, 2026 | 06:45 PM
Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड
  • 350 विकेट्स क्लबमध्ये एन्ट्री
  • कपिल देव यांच्या यादीत स्थान
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्याच सत्रात श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना बाद केले. तिसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने लक्षणीय प्रभाव पाडला. जडेजाने तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत एक ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याने केसरा नुवान्थाला बाद करून ३५० कसोटी विकेट्स पूर्ण केले. यासह त्याने कपिल देव यांच्या यादीत स्थान मिळवले.

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

रवींद्र जडेजाने गाठला ऐतिहासिक मोठा टप्पा

कपिल देव यांच्यानंतर रवींद्र जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ३५० विकेट्स घेणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडूही ठरला आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ५,२४८ धावा केल्या आणि ४३४ विकेट्स घेतले. या यादीत डॅनियल व्हेटोरी दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ४,५३१ धावा केल्या आहेत आणि ३६२ विकेट्स घेतले आहेत.

१०२ कसोटी सामन्यांमध्ये ५,२०० धावा आणि ३८३ विकेट्स घेऊन इयान बोथम तिसऱ्या स्थानावर आहे. तर, रवींद्र जडेजाने ९० कसोटी सामन्यांमध्ये ४,१०८ धावा आणि ३५० विकेट्स मिळवून या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात २५ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. त्यानंतर त्याने १९ षटकांत ५७ धावा देऊन २ विकेट्स घेतले आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

३५० कसोटी विकेट घेणारा पाचवा भारतीय

जडेजाने ३५० विकेट्सचा टप्पा गाठून भारतीय कसोटी क्रिकेटमधील एका विशेष यादीत स्थान मिळवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत अनिल कुंबळे ६१९ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विन ५३७, कपिल देव ४३४ आणि हरभजन सिंग ४१७ कसोटी विकेट्ससह आहेत. आता जडेजानेही आपल्या नावावर ३५० विकेटची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा जडेजा हा जगातील केवळ तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

रवींद्र जडेजाची शानदार कारकीर्द

३७ वर्षीय रवींद्र जडेजाने आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये ४१०८ धावा केल्या असून ३५० विकेट्स घेतले आहेत. त्याने २१० एकदिवसीय सामन्यांमध्ये २९०५ धावा केल्या असून २३२ विकेट्स घेतले आहेत. तसेच, त्याने ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१५ धावा केल्या असून ५४ विकेट्स घेतले आहेत.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरा फिरकी गोलंदाज

  • ४३३ – रंगना हेरथ
  • ३६२ – डॅनियल व्हेटोरी
  • ३५०* – रवींद्र जडेजा
  • २९७ – डेरेक अंडरवुड
  • २७१ – तैझुल इस्लाम
पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियन! Manchester Super Giants चा ‘द हंड्रेड’च्या ट्रॉफीवर कब्जा; गोएंका यांची पोस्ट चर्चेत

Web Title: Ravindra jadeja 350 test wickets 4000 runs kapil dev record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Kapil Dev
  • Ravindra Jadeja
  • Test Series

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेला भारताने लावली आग! 284 वर केला सुपडासाफ; Team India कडे तब्बल…
1

IND Vs SL: श्रीलंकेला भारताने लावली आग! 284 वर केला सुपडासाफ; Team India कडे तब्बल…

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…
2

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली
3

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले
4

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.