
रवींद्र जाडेजाशी धोनीसाठी खास पोस्ट
महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. भारताने त्याच्या नेतृत्वात 28 वर्षांनी आयसीसी वर्ल्ड कप जिंकला होता. आयपीएलमध्ये देखील चेन्नई सुपर किंग्जला धोनीने तब्बल 5 वेळेस विजेतेपद पटकावून दिले आहे. या आपल्या खास मित्राने निवृत्ती घेतल्यावर भारतीय क्रिकेटर आणि सीएसकेचा खेळाडू जाडेजाने धोनीसाठी पोस्ट केली आहे. जाडेजा आणि धोनी हे खूप जून आणि चांगले मित्र असल्याचे अनेकदा आपण अनेक क्षणांमधून पहिले आहे.
MS Dhoni Retirement: ‘…तो क्षण अजूनही आठवतो’ धोनीच्या निवृत्तीवर क्रिकेटच्या ‘देवा’ची भावूक पोस्ट
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने इन्स्टाग्रामवर धोनीसोबतचा मैदानावरील शेवटचा फोटो शेअर करत अत्यंत भावूक पोस्ट केली आहे. मैदानावरील आमचा शेवटचा एकत्रित फोटो. 8 फेब्रुवारी 2009 पासूनचे माझे मार्गदर्शक,’ अशी पोस्ट रवींद्र जाडेजाने शेअर केली आहे.
सचिन तेंडुलकरने देखील केली पोस्ट
बांग्लादेशमध्ये धोनीला फलंदाजी करताना पाहण्याचा क्षण मला अजूनही आठवतो. त्याच्या पॉवर हिटिंगमध्ये काहीतरी खास आहे असे मी त्यावेळेस सौरव गांगुलीला सांगितले होते. तिथून आतापर्यंत धोनीने केलेला प्रवास हा अत्यंत अद्भुत आहे. तुझ्यासाह ड्रेसिंग रूम शेअर करणे आणि भारतीय क्रिकेटमधील काही सर्वात अविस्मरणीय क्षणांचा भाग असणे हा खरोखरच खूप जास्त आनंदाचा भाग आहे. तू काहीतरी खास करशीलच असा मला विश्वास होताच. मात्र तू त्यापेक्षा मोठे यश मिळवलेस. तू भारतीय क्रिकेटला तुझे सर्वोत्तम दिले आहेस. हा प्रवास तुझ्यासोबत अनुभवता आला, याचा मनापासून आनंद आहे. वेल प्लेड, एमएस!
MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त
Ans: महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीनंतर त्याचा जवळचा मित्र आणि चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी रवींद्र जाडेजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली.
Ans: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.