RCB: आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास, सौजन्य : इन्स्टाग्राम
अनेक काळापासून टीमसोबत असणारे देवा यांना एक आजार जडला होता. तो आजार इतका बळावला की, त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत. ते आरसीबी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होते असे आरसीबी व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आरसीबीच्या व्यवस्थापनाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यापासूनचे स्मरणात राहतील असे अविस्मरणीय क्षण असो वा देवा यांचे ड्रमवादन हे आरसीबीसाठी सामन्याच्या दिवशी अनुभवाचे विविध अंग राहिले आहे.
ते पुढे म्हणतात की, रविवारी मध्यरात्री वयाच्या 64 व्या वर्षी आरोग्या संबंधित कारणांमुळे आपण देवा यांना गमावले. त्यांना प्रेमाने कन्नडचा ‘शिवमणी’ या नावाने ओळखले जायचे. देवा यांच्या वाद्याचा आवाज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नेहमीच गुंजत राहिल व तो नेहमीच आरसीबीच्या लोक साहित्याचाही भाग असेल. अनेक वर्ष आमचे मनोरंजन केल्याबाबत धन्यवाद. आपल्या आत्म्यास शांती लाभो.
Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक
View this post on Instagram
A post shared by Royal Challengers Bengaluru (@royalchallengers.bengaluru)
बंगळुरूने पहिले जेतेपद 2025 साली जिंकले होते. 18 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर फ्रँचायजीने चषक जिंकले होते. ही किमया रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात झाली. याअगोदर विराट कोहलीपासून ते अनेक दिग्गजांनी या फ्रँचायजीची कमान सांभाळली, पण ते संघाला जेतेपद मिळवून देऊ शकले नाही.
पाटीदारच्या नेतृत्त्वाची कमाल येथपर्यंत थांबली नाही, तर त्याच्या पुढील हंगामात म्हणजेच या वर्षी 2026 मध्येही त्यांनी ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे नक्कीच या फ्रँचायजीला सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर नाम कोरायचे असेल. आता हे पाहणे उत्सुकतेचे असेल की, आगामी हंगामात गतविजेत्याच्या रुपात आरसीबी कशाप्रकारे कामगिरी करते.
‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral






