Why did RCB team show Mohammad Siraj the way out? The reason has come to light, read in detail..
RCB team removed Mohammad Siraj :आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी सर्वच संघांच्या फ्रेंचायझींकडून आपल्या संघात अपेक्षित बदल करण्यात आले होते. पण काही खेळाडूंबाबत घेण्यात आलेला निर्णय हा अनपेक्षित असाच होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आरसीबीने संघाकडून सात वर्षे खेळलेल्या स्टार मोहम्मद सिराजला रिलीज करण्यात आल होतं. त्यानंतर मेगा लिलावात सिराजसाठी गुजरात टायटन्सकडून बोली लावण्यात आली होती. त्यामुळे सिराज हा जीटीकडून गेला. मात्र, हे का घडलं? याबद्दल कुणाला माहिती नव्हतं, परंतु आता यामागील कारण समोर आले आहे.
आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर बोबाट यांचा सिराजला रिलीज करण्याचा निर्णय होता. याबाबत त्यांनी आता स्वत: खुलासा दिल आहे. बोबाट यांनी सांगितलं की, “आरसीबीचा हेतू समतोल साधून भक्कम गोलंदाजी लाइनअप तयार करण्याचा होता. ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठीची तयारी असेल. भुवनेश्वर कुमारला संघात सामील करून घेण्याचा हेतू स्पष्ट होता. कारण त्याचा अनुभव आणि स्विंग गोलंदाजीची क्षमता आरसीबी संघासाठी खूप महत्त्वाची होती.” असे बोबाट यांनी सांगितले.
बोबाट यांनी पुढे सांगितलं की, “मोहम्मद सिराजला रिटेन करण्यात आले असते तर, भुवनेश्वर कुमार संघात सामील करून घेणं अवघड झालं असतं. कारण मेगा लिलावात बजेट आणि खेळाडूंची प्राथमिकतेचं संतुलन देखील राखणं खूप महत्त्वाचं होतं.” क्रिकबजशी बोलत असताना बोबट यांनी स्पष्ट केलं की, “सिराज असा एक खेळाडू होता की त्याच्याबाबत यांच्याकडून सर्वाधिक विचार करण्यात आला होता. भारतीय आंतरराष्ट्रीय गोलंदाज सहज उपलब्ध होत नाहीत. आम्ही सिराजबाबत सर्व संभाव्य चर्चा करून बघितल्या होत्या. मग त्याला रिटेन करण्याचा विचार केला. हा कठीण निर्णय होता. आम्ही भुवनेश्वर कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात घेण्याचा प्रयत्न करत होतो. सिराजला संघात ठेवणं अवघड झालं असतं. या सर्व गोष्टीमध्ये कधीच एक कारण असून शकत नाही.”
बोबाटन यांनी असा देखील खुलासा केला की, “ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला रिटेन करण्यात आले नाही, जर तो तंदरूस्त असता तर आम्ही त्याला नक्कीच रिटेन केलं असतं.”