इम्रान ताहिर(फोटो-सोशल मीडिया)
Caribbean Premier League 2025 : दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा माजी खेळाडू इम्रान ताहिरने ४६ व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात मोठा पराक्रम केला आहे. इम्रान ताहिर सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळत आहे. या दरम्यान, अमेझॉन वॉरियर्सचा तो कर्णधार असून त्याने अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाविरुद्ध ५ विकेट्स घेऊन त्याने विक्रम रचला आहे.
सीपीएल २०२५ मध्ये शनिवारी झालेल्या अमेझॉन वॉरियर्स आणि अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यातील सामन्यात त्याच्या संघाने बाजी मारली आहे. या दरम्यान, या सामन्यात ताहिरने आपल्या गोलंदाजीचा चमत्कार दाखवला. त्याच्या कामगिरीने त्याने संघाला ८३ धावांनी विजय मिळवून दिल आहे. इम्रान ताहिरने अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सविरुद्ध ४ षटकांत २५ धावा मोजून ५ विकेट चटकावल्या. यासह, तो टी२० स्वरूपात ५ विकेट घेणारा जगातील सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
गयाना अमेझॉन वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत २११ धावा उभारल्या. संघाकडून शाई होपने ५४ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ८२ धावा केल्या आहेत. तसेच शिमरॉन हेटमायरने देखील २५० च्या स्ट्राईक रेटसह नाबाद ६५ धावा काढल्या. तर रोमारियो शेफर्डने फक्त ८ चेंडूत २५ धावा करून संघाचा स्कोअर २११ पर्यंत नेऊन पोहचवला.
गयानाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग कारायला उतरलेल्या अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाला १५.२ षटकात फक्त १२८ धावाच करता आल्या. या दरम्यान, करिमा गोरने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्यानंतर कुणाला मैदानावर तग धरता आला नाही. परिणामी अमेझॉन वॉरियर्सने ८२ धावांनी सामना जिंकला. अमेझॉन वॉरियर्सच्या या विजयाचा हीरो कर्णधार इम्रान ताहिर ठरला.
दक्षिण आफ्रिकेच्या ४६ वर्षीय इम्रान ताहिर आता टी२० मध्ये पाच विकेट घेणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. वयाच्या ४० व्या वर्षानंतर ही कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम मलावीचा कर्णधार मुअज्जम अली बेगच्या नावावर जमा होता. २००४ मध्ये कॅमेरूनविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने एकूण पाच विकेट्स घेण्याची किमया केली होती. याशिवाय, ४६ वर्षे १४८ दिवसांच्या वयात पाच विकेट्स घेणारा ताहिर दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे.
हेही वाचा : ‘…त्याच्या संघासाठी खूप विचार करतो’, रोहित शर्माच्या नेतृत्वाचे ‘द वॉल’ राहुल द्रविडकडून कौतुक
टीम २० मध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणारे गोलंदाज