आयपीएलआधी कोहलीला गवसला सूर (फोटो- ai gemini )
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल
आयपीएलआधी विराट कोहलीने केला सराव
जितेश शर्माने केली अर्धशतकी खेळी
IPL 2026: येत्या आठवड्यापासून म्हणजेच 28 मार्चपासून आयपीएल (Indian Premire Legue) सुरू होणार आहे. 28 मार्च रोजी पहिला सामना गतविजेती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. विराट कोहली आणि जीतेश शर्माने जोरदार खेळी केली आहे.
आयपीएलआधी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातर्गत सराव सामना खेळला गेला. यमध्ये प्रमुख खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे संघासाठी आणि चाहत्यांसाठी ही चांगली बाब असल्याचे म्हटले जात आहे. सराव सामन्यात प्रमुख खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली.
जितेश शर्माने केली जोरदार खेळी
बंगलोरच्या संघाचे विकेटकिपर असणारा जितेश शर्मा याने चांगली कामगिरी केली आहे. सराव सामन्यात त्याने 37 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीमध्ये आक्रमकपणा आणि आत्मविश्वास दिसून आला. येत्या सीझनमध्ये जितेश शर्मा चांगली कामगिरी करेल असा विश्वास संघाला आणि मॅनेजमेंटला देखील वाटत आहे.
विराट कोहलीची चांगली कामगिरी
विराट कोहलीने देखील सराव सामन्यात चांगली कामगिरी केल्याने संघाची चिंता मिटली आहे. विराट कोहलीने 12 चेंडूत 29 धावा केल्या. आक्रमक शैलीत त्याने फलंदाजी केली. विराट कोहलीला फोरम गवसणे हे बंगलोर संघासाठी चांगली बातमी असणार आहे. सराव सामन्यात अन्य फलंदाजांनी देखील चांगले योगदान दिले. त्यामुळे आरसीबीचा संघ सडफह्य मजबूत स्थितीत दिसून येत आहे.
खेळणार की नाही खेळणार! ODI World Cup मध्ये ‘हे’ संघ बाद होणार? चाहत्यांसाठी दु:खद बातमी
गोलंदाजांचे योगदान काय?
सराव सामन्यात केवळ फलंदाज नव्हे तर गोलंदाज देखील चमकले. भुवनेश्वर कुमारने उत्तम गोलंदाजीने सर्वांना प्रभवित केले. मंगेश यादवने देखील चांगली गोलंदाजी केली. आरसीबीचा संघ 28 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
कोहलीची RCB कडे ‘चार्टर्ड फ्लाईट’ची मागणी?
IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वीच, विराट कोहली मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अलीकडेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी संबंधित एक बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाली. या व्हायरल झालेल्या वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, विराटने RCB फ्रँचायझीकडे भारत आणि लंडन दरम्यान चार्टर्ड विमानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. आता, विराट कोहलीने अखेर या वृत्तांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या दाव्याचा स्क्रीनशॉट शेअर करत, त्याने त्यासोबत दोन हसणारे इमोजी जोडले; यातून त्याने हे स्पष्ट केले की, ही संपूर्ण कहाणी केवळ एक अफवा आहे आणि यात काहीही तथ्य नाही.






