(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यंदा शाहरुख खानने मोठी झेप घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो 2024 मध्ये तिसऱ्या स्थानावर होता, मात्र आता नंबर-1 बनत त्याने आपली मजबूत ब्रँड व्हॅल्यू पुन्हा सिद्ध केली आहे. त्याच्या पाठोपाठ रणवीर सिंह दुसऱ्या स्थानावर असून, 162.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. तर गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला क्रिकेटपटू विराट कोहली यंदा 158.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
ही रँकिंग अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा शाहरुख खान त्याच्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे रणवीर सिंह ‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या यशाचा आनंद घेत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मुळे त्याने 1000 कोटी रुपयांच्या हिंदी नेट क्लबची सुरुवात करत बॉक्स ऑफिसचा नवा बादशाह ठरण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
यंदाच्या अहवालातील सर्वात विशेष बाब म्हणजे रणवीर सिंहने विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. 162.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह रणवीर, विराटच्या 158.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या व्हॅल्यूपेक्षा पुढे गेला आहे. यावरून त्याची वाढती ब्रँड व्हॅल्यू, एंडोर्समेंट्स आणि डिजिटल प्रभाव स्पष्ट दिसून येतो.
शाहरुख खान पहिल्या आणि रणवीर सिंह दुसऱ्या स्थानावर असल्याने हा अहवाल पुन्हा एकदा सिद्ध करतो की हे दोघे भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन सुपरस्टार्सपैकी आहेत. ‘किंग’ आणि ‘धुरंधर’ हे सध्या देशातील सर्वाधिक चर्चेत असलेले चित्रपट ठरले असून, ही नवी रँकिंग पडद्यावर आणि पडद्याबाहेरही त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.
Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत






