(फोटो सौजन्य-JioHotstar)
RCB आपला विजेतेपदाचा किताब राखण्याच्या ठाम इराद्याने या हंगामात उतरत आहे. विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे, संघाची फलंदाजी फळी अत्यंत मजबूत दिसत आहे; या फळीचे नेतृत्व स्टार फलंदाज रजत पाटीदार करत आहे. संघाला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचाफायदाही मिळेल, जिथे त्यांना आपल्या चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळणार आहे. मागच्या वर्षीच्या विजयानंतर आता या संघामध्ये वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा संघ या वेळी अनेक नवीन बदलांसह मैदानात उतरणार आहे. या हंगामासाठी संघाचे कर्णधारपद ईशान किशनच्या हाती सोपवण्यात आले आहे, कारण नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसल्यामुळे कर्णधार पदाची धुरा इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. संघाची धुरा सांभाळता त्याचा आपला फॉर्मही तितकाच तगडा असेल तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. संघात बरेच बदल करण्यात आले असून हे बदल संघासाठी सकारात्मक ठरतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. मागील हंगाम या संघासाठी फारसा संस्मरणीय ठरला नव्हता; त्यामुळे, या वेळी हैदराबादकडून खूपच सुधारलेली कामगिरी अपेक्षित आहे.
IPL २०२६ चा ओपनिंगचा सामना शनिवार, २८ मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. TV वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर उपलब्ध असेल. मोबाईल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी, चाहते ‘Jio Hotstar’ ॲप आणि वेबसाइटद्वारे सामन्याचे थेट प्रक्षेपण म्हणजेच Live Streaming पाहू शकतात.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, टिम डेव्हिड, जेकब बेथेल, रोमारियो शेफर्ड, जोश हेझलवुड, नुवान थुशारा, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, रसिक दार, भुवनेश्वर कुमार, जॉर्डन कॉक्स, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, स्वप्नील सिंग, जेकब डफी, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, मंगेश यादव, फिल सॉल्ट, सात्विक देसवाल, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा.
इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा, स्मरण रविचंद्रन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, लियाम लिव्हिंगस्टोन, कामिंदू मेंडिस, क्रियांश फुलेत्रा, ब्रायडन कारसे, प्रफुल्ल हिंगे, साकीब हुसेन, साकीब हुसेन, साकीब हुसेन, उन्मेष, जयदेव तरूणी. हर्षल पटेल, इशान मलिंगा, डेव्हिड पायने, हर्ष दुबे, अमित कुमार, जीशान अन्सारी
दोघांकडेही तगडे प्लेयर्स असल्यामुळे IPL 2026 चा आगाज जोरदार असणार आहे त्याच सुरुवातीचा सामनाही रंगत आणणार आहे एवढं मात्र नक्की !






