भारताचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याचा शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकावर कार आदळल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला. तर त्याची कारही आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. ऋषभला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पंत यांने स्वत: सांगितले. मात्र, ऋषभ पंतला याआधीही या उत्तर प्रदेशात एकदा नव्हे तर दोनदा वेगात गाडी चालवल्याबदल दंड भरण्यास सांगितलयं.
[read_also content=”संतापजनक! अपघातानंतर रस्त्यावर पडुन होता ऋषभ पंत, कुणी गाडीतून पडलेले पैसे उचलत होतं तर कुणी व्हिडिओ काढत होतं https://www.navarashtra.com/sports/after-accident-people-are-busy-in-collecting-money-and-making-video-instead-of-saving-him-nrps-358084.html”]
उत्तर प्रदेश पोलिस वाहतूक संचालनालयाने ऋषभ पंतला दंडाची रक्कम जमा करण्यासाठी नोटिसाही पाठवल्या आहेत. या अंतर्गत यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजता ऋषभ पंतच्या मर्सिडीज कारने (DL10CN1717) वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. ओव्हर स्पीडने धावणारी कार रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. याबाबत मोटार वाहन कायद्यांतर्गत पंत यांना २००० रुपयांची नोटीस बजावण्यात आली होती, जी अद्याप त्याने भरलेली नाही. त्यानंतर 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता त्याने याच कारने पुन्हा वेगमर्यादेचे उल्लंघन केले. त्यानंतर त्याला पुन्हा 2000 रुपयांची नोटीस पाठवण्यात आली. उत्तरप्रदेश सरकारच्या परिवहन विभागाच्या माहितीनुसार, सध्या दोन्ही चालानची रक्कम जमा झालेली नाही.