बांगलादेश आणि हाँगकाँग(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh vs Hong Kong : आशिया कप २०२५ स्पर्धेतीलतिसरा सामना हाँगकाँग आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना अबू धाबी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामान्यापूर्वी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर हाँगकाँग संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. परंतु, फलंदाजी करत हाँगकाँग संघाने ७ विकेट्स गमावून बांगलादेशसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हाँगकाँगकडून निजाकत खानने सर्वाधिक ४२ धावा केल्या आहेत. तर बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने चांगली गोलंदाजी करत २ विकेट्स घेतल्या. आता लिटन दासच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ हाँगकाँगने दिलेले लक्ष्य गाठून स्पर्धेची विजयी सुरवात करण्यास प्रयत्नशील असणार आहे.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हाँगकाँगची सुरवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अंशुमन रथ ४ धावा करून माघारी परतला. त्याला तस्किन अहमदने बाद केले. त्यानंतर बाबर हयात आणि झीशान अलीने डाव सावरला, परंतु बाबर हयात १४ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर झीशान अली जो चांगला खेळत होता त्याला ३० धावांवर हसन साकिबने माघारी पाठवले. त्यानंतर निजाकत खान आणि कर्णधार यासीम मुर्तझा यांनी टिकून फलंदाजी करत हाँगकाँगचा डाव सावरत असल्याचे दिसत असताना यासीम मुर्तझा धावबाद झाला. त्याने २८ धावा केल्या. निजाकत खानने ४० चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याला रिशाद हुसेन बाद केले. त्यांनंतर किंचिन शाह ० धावा करून बाद झाला, त्याला देखील रिशाद हुसेनने माघारी पाठवले. कल्हान छल्लू ४ धावा आणि एहसान खान २ धावा करून नाबाद राहिले. बांगलादेशकडून हसन साकिब, तस्किन अहमद आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
हेही वाचा : Women’s Hockey Asia Cup मध्ये भारताला धक्का! चीनकडून ४-१ असा पराभव
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसेन इमॉन, तन्झिद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक/कर्णधार), तौहीद हृदोय, शमीम हुसैन, झकर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान
हाँगकाँग संघ खालीलप्रमाणे
हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): झीशान अली (यष्टीरक्षक), अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, कल्हान छल्लू, किंचिन शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतिक इक्बाल
बातमी अपडेट होत आहे..