Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने इतिहास रचला. त्याने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले आणि एक शानदार शतक झळकावले. इतकंच नाही तर पहिला भारतीय खेळाडूचा मान मिळवला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 19, 2026 | 10:58 PM
रोहित शर्माने बनवला नवा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रोहित शर्माने बनवला नवा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माचा धमाका
  • लॉर्ड्सवर शतक ठोकणार पहिला भारतीय खेळाडू 
  • बनवला नवा रेकॉर्ड, इंग्लंडला आणले जेरीस 
भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात जेव्हा टीम इंडियाला ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्या सर्वात अनुभवी फलंदाजाची गरज होती, तेव्हा रोहित शर्माने एक शानदार खेळी खेळून मोठ्या सामन्यांसाठी एक खेळाडू म्हणून आपली योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर शानदार शतक झळकावून, रोहितने केवळ भारताच्या आशाच जिवंत ठेवल्या नाहीत, तर आपल्या नावावर एक असा कारकिर्दीतील विक्रमही नोंदवला, जो यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाने केला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा निवृत्ती घेणार अशा अफवा पसरल्या होत्या. रोहित शर्माने यावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र आज लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने आपल्या फलंदाजीने सर्व जगाचे तोंड बंद केले आणि इतकंच नाही तर एक नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माचा फॉर्म नाही अशी टीका झाली होती. मात्र रोहितने सर्वांची तोंडं आपल्या खेळीने बंद केली आहेत. 

Rohit Sharma Record: निवृत्ती ते काय असतं? क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत Hitman ठरला नंबर 1, शतकही केले पूर्ण

रोहितचे धमाकेदार शतक 

That’s the way to thrash all the retirement rumors with a terrific century Rohit Sharma isn’t going anywhere – he will be in the 2027 WC team. pic.twitter.com/5yKNjOmoFt — Sharat Chandra (@Sharatsays2) July 19, 2026

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माने ८४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५१ वे शतक आहे. या अविस्मरणीय खेळीसह, तो लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एकदिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित मैदानांपैकी एक असलेल्या लॉर्ड्सवर अनेक भारतीय दिग्गजांनी अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्रिशतकी धावसंख्या गाठणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे.

रोहित शर्माची निवृत्ती होती चर्चा 

अलीकडच्या काळात, रोहित शर्माचे भविष्य आणि निवृत्तीबद्दल सतत चर्चा सुरू आहे. मात्र, या स्टार सलामीवीराने या सर्व अटकळांना एखाद्या वक्तव्याने नव्हे, तर आपल्या बॅटने उत्तर दिले. कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना, त्याने सुरुवातीपासूनच सावधपणे फलंदाजी केली आणि इंग्लिश गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला.

भारतासमोर विजयासाठी ३८८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य होते. रोहितने उत्कृष्ट टायमिंग आणि जोरदार फटकेबाजी करत डावाची सूत्रे हाती घेतली. आपल्या खेळीदरम्यान, त्याने इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी केली आणि केवळ ८४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करून इतिहास रचला.

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

रोहितची विशेष कामगिरी 

रोहितचे शतक केवळ एक वैयक्तिक यश नव्हते, तर भारतीय क्रिकेटसाठीही एक विशेष कामगिरी होती. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू बनून त्याने आपल्या नावापुढे आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर घातली. हे त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५१ वे शतकही होते, ज्यामुळे क्रिकेटच्या महान फलंदाजांच्या यादीत त्याचे स्थान आणखी उंचावले.

Web Title: Rohit sharma becomes first indian player to score odi century at lords made record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:46 PM

Topics:  

  • Century
  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
3

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.